अरुणाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशात भूकंपाचे धक्के
गुवाहाटी : अरुणाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशात रविवारी भूकंपाचे (earthquakes) धक्के जाणवले. अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम भागात दुपारी १२.१२ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले, तर मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये दुपारी १ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदेशात भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 12.12 वाजता भूकंपाचे धक्के बसले. भूटान सीमेजवळील पश्चिम कामेंग येथे भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किमी खोलीवर होता. मध्य-उत्तर आसाम आणि भूतानच्या पूर्व भागापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. अधिकाऱ्यांनी सांगितले की भूकंपानंतर लगेचच कोणतीही दुखापत किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. वास्तविक, उत्तर-पूर्व प्रदेश हा भूकंपाच्या उच्च क्षेत्रात येतो. येथे अनेकदा भूकंप होतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही लोकांनी सांगितले की, आज दुपारी अचानक घरातील वस्तू हलू लागल्या. घरात ठेवलेले पलंगही कंप पावत होते. मग लक्षात आलं की, हे भूकंपाचे धक्के आहेत. दरम्यान, काही वेळातच सर्वकाही पूर्ववत झाले.
दुसरीकडे, रविवारी दुपारी 12.54 वाजता मध्य प्रदेशात (Earthquake) भूकंपाचे सौम्य धक्के बसले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता तीन इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू इंदूरपासून 151 किमी अंतरावर होता. भूकंप 10 किमी खोलीवर झाला.
Shambhuraj Desai : शिवसेना पक्षनिधीबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय, तीव्र संघर्ष होणार?
शुक्रवारी आणि गुरुवारीही जम्मू-काश्मीर आणि मेघालयमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे शुक्रवारी 3,6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. सकाळी 5:01 वाजता झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कटरापासून 97 किमी पूर्वेला 10 किमी खोलीवर होता. भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही