EPF खातेधारकांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट; व्याजदरात घसघशीत वाढ

EPF खातेधारकांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट; व्याजदरात घसघशीत वाढ

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने मंगळवारी आपल्या बैठकीमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफवर) 2022-23 साठी 8.15 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. मार्च 2022 मध्ये ईपीएफओने आपल्या जवळपास 5 कोटी खातेधारकांसाठी 2021-22 साली ईपीएफवरील व्याजदर कमी करुन तो 8.1 टक्के केला होता. हाच रेट 2020-21 मध्ये 8.5 टक्के होता. 1977-78 नंतर हा सर्वात कमी दर होता जेव्हा ईपीएफवरील व्याजदर 8 टक्के होता.

तुमचे मेहनतीचे हजार रुपये वाचवण्यासाठी उरले केवळ तीन दिवस

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओचा निर्णय घेणाऱ्या सीबीटीने मंगळवारी आपल्या बैठकीमध्ये 2022-23साठी ईपीएफवर 8.15 टक्के व्याज देण्याचा निर्णय निश्चित केला आहे. सीबीटीने 2020-21 साठी ईपीएफवर 8.5 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय मार्च 2021मध्ये घेतला होता.

Elon Musk यांची मोठी घोषणा! ट्विटर पोल्ससाठी केवळ अधिकृत खातीच ठरतील पात्र

सीबीटीच्या निर्णयानंतर 2022-23 साठीच्या ईपीएफवप जमा झालेल्या व्याजदरावर सहमतीसाठी हा प्रस्तावर केंद्रीय वित्त मंत्रलयाकडे पाठवण्यात येईल. सरकारच्या संमतीनंतर 2022-23 साठीची ही रक्कम खातेधारकांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube