कारगिल, ऑपरेशन सिंदूर ते आयोध्या! राम मंदिर ट्रस्टचे नवे सीईओ निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रांचा प्रवास…
Retired Air Marshal Jeetendra Mishra new CEO of Ram Temple Trust कारगिल, ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका कसा आहे प्रवास?
From Kargil Operation Sindoor to Ayodhya Journey of Retired Air Marshal Jeetendra Mishra new CEO of Ram Temple Trust : अयोध्येतील श्रीराम मंदिर ट्रस्टला अखेर पहिला मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मिळाला आहे. एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र कारगिल, ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे त्यांचा प्रवास कसा आहे जाणून घ्या सविस्तर…
कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?
निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा हे उत्तर प्रदेशातच असलेल्या देवरिया येथील आहेत. जितेंद्र त्यांनी विविध प्रतिष्ठित संरक्षण शिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण घेतले आहे. त्यात पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA), बंगळुरूमधील एअर फोर्स टेस्ट पायलट्स स्कूल, अमेरिकेतील एअर कमांड अँड स्टाफ कॉलेज तसेच ब्रिटनमधील रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज येथे शिक्षण आणि विशेष प्रशिक्षण पूर्ण केले आहे. ते नुकतेच म्हणजे 30 एप्रिल 2026 रोजी भारतीय सैन्यातून निवृत्त झाले आहेत. ते भारतीय हवाई दलाच्या पश्चिम कमांडचे प्रमुख होते. त्यांनी ऑपरेशन सिंदूरसह कारगिल युद्धात देखील महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. मिश्रा यांना युद्ध सेवा पदत (एसवायएसएम), अति विशिष्ट सेवा पदक (एव्हीएसएम) आणि विशिष्ट सेवा मेडल (व्हीएसएम) या पदकांनी सन्मानिक करण्यात आलं आहे.
औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीवर MPSC अध्यक्षांचा खुलासा; ‘घटना माझ्या पदभारापूर्वीची’
मिश्रा यांनी त्यांच्या 38 वर्षांच्या कार्यकाळामध्ये अनेक महत्त्वाचे कमांड आणि स्टाफ पदांवर काम केलं. यामध्ये फायटर स्क्वाड्रनच्या कमांडिंग ऑफिसर, एअरक्राफ्ट अँड सिस्टम्स टेस्टिंग एस्टेब्लेशमेंट (ASTE) मध्ये चीफ टेस्ट पायलट, दोन फ्रंटलाईन एअर बेसचे एअर ऑफीसर कमांडींग, एअर एचक्यू (VB) मध्ये डायरेक्टर (ऑपरेशनल प्लानिंग अँड असेसमेंट ग्रुप), प्रिंसिपल डायरेक्टर (ASR) आणि असिस्टंट चीफ ऑफ एअर स्टाफ (प्रोजेक्ट्स), ASTE के कमांडंट आणि इंटीग्रेटेड डिफेंस स्टाफ (डॉक्ट्रिन, ऑर्गनाइज़ेशन आणि ट्रेनिंग) च्या डेप्युटी चीफ यांसारखे पद समाविष्ट आहेत. तर निवृत्त होण्याच्या अगोदर ते ज्या पदावर होत त्या अगोदर ते इंटीग्रेटेड डिफेंस स्टाफ (ऑपरेशन्स) चे डेप्युटी चीफ होते.
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान या कमांडचे नेतृत्व…
जानेवारी 2025 मध्ये जितेंद्र मिश्रा यांनी भारतीय हवाई दलाच्या अत्यंत महत्त्वाच्या ऑपरेशनल कमांडपैकी एक असलेल्या वेस्टर्न एअर कमांडची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान या कमांडचे नेतृत्व केले. पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमधील दहशतवादी तळांविरोधात ही मोहीम राबवण्यात आली होती.
राम मंदिर ट्रस्टमध्ये जितेंद्र मिश्रा यांची नेमकी जबाबदारी काय असेल?
एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्याकडे आता श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची (CEO) महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राम मंदिराच्या व्यवस्थापनात अधिक व्यावसायिकता, पारदर्शकता आणि शिस्तबद्ध प्रशासन आणण्यासाठी काम करणारसीईओ आपल्या जबाबदाऱ्या स्वतंत्रपणे पार पाडतील आणि ते ट्रस्टच्या सरचिटणीसांना अहवाल देतील.
डिंभे-माणिकडोह बोगद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी; अहिल्यानगरला दिलासा, वळसे पाटलांचा विरोध
तसेच संस्थेच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजन आणि विकास आराखडा तयार करतील.राम मंदिर ट्रस्टच्या कायदेशीर, प्रशासकीय आणि आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवण्याची प्रमुख जबाबदारी सीईओंकडे असेल. ट्रस्टच्या वाढत्या कामकाजानुसार आवश्यक प्रशासकीय व्यवस्था, कार्यपद्धती आणि व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्याचे कामही त्यांना करावे लागेल.
पुणे दौऱ्यात शिंदेंची आढळरावांच्या घरी अनपेक्षित भेट कारण काय? राजकीय चर्चांना उधाण…
याशिवाय, ट्रस्टची संघटनात्मक रचना अधिक सक्षम करणे, कायदेशीर आणि नियामक नियमांचे पालन सुनिश्चित करणे तसेच ट्रस्ट डीडनुसार सर्व कामकाज योग्य पद्धतीने सुरू आहे यावर लक्ष ठेवणे, हीदेखील सीईओंची महत्त्वाची भूमिका असेल.एकूणच, राम मंदिर ट्रस्टच्या दैनंदिन प्रशासनापासून ते भविष्यातील विस्तार आणि नियोजनापर्यंत सर्व बाबींमध्ये सीईओ हे प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील. मंदिराशी संबंधित व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्याची मोठी जबाबदारी आता जितेंद्र मिश्रा यांच्या खांद्यावर असेल.