‘अंतराळातून पृथ्वीवरील वाद क्षुल्लक वाटतात’; अंतराळवीर सुनिता विल्यम्स ‘नासा’तून निवृत्त…

अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांनी नासामधून निवृत्ती घेतलीयं. नासामधून निवृत्त ६० वर्षीय सुनीता विल्यम्स सध्या भारत दौऱ्यावर एका कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं.

Untitle (5)

sunita williams : अंतराळवीर सुनिता विल्यम्स(sunita williams) यांनी नासामधून निवृत्ती घेतलीयं. सुनिता विल्यम्स सध्या भारत दौऱ्यावर असून अमेरिकन सेंटरमध्ये ‘आइज ऑन द स्टार्स, फिट ऑन द ग्राउंड’ या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

पेन्शनधारकांना 2030 सालापर्यंत मिळत राहणार पैसे; नेमका काय आहे सरकारचा निर्णय?

पुढे बोलताना विल्यम्स म्हणाल्या, जेव्हा तुम्ही अंतराळातून पृथ्वीकडे एक ‘अखंड ग्रह’ म्हणून पाहता, तेव्हा मानवामधील वाद किंवा मतभेद अतिशय क्षुल्लक व हास्यास्पद वाटतात, असं सुनिता विल्यम्स यांनी स्पष्ट केलंय.

तसेच अंतराळाने दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. अवकाशात सुरुवातीला आपण आपले घर शोधतो. वडील भारतीय, आई स्लोव्हेनियन असल्याने मी सुरुवातीला या जागा शोधल्या. परंतु हळूहळू जाणीव होते की, आपली संपूर्ण पृथ्वी हाच एक जिवंत ग्रह आहे. तिथून बदलणारे ऋतू, समुद्राचे बदलणारे रंग आणि बर्फाचे थर पाहताना आपण सर्व एक आहोत याची प्रचीती येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

Davos Summit : मुख्यमंत्री कोणताही असो दरवर्षी जानेवारीत गाठतो दाओस; पण तिथे नक्की काय होतं?

अमेरिकन सेंटरमध्ये पार पडलेल्या ‘आइज ऑन द स्टार्स, फिट ऑन द ग्राउंड’ या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य, अंतराळातील कचरा, मोहिमा यासारख्या प्रश्नांना उत्तरे दिली. सुनीता विल्यम्स यांनी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) मधून निवृत्ती घेतली. २७ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी आपल्या २७ वर्षांच्या गौरवशाली कारकीर्दीचा निरोप घेतला.

follow us