धनत्रयोदशीपूर्वी सोन्याच्या दरात पुन्हा तेजी, आज 4,800 रुपयांची मोठी वाढ; जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today : भारतीय बाजारात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण येत

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Gold Price Today

Gold Price Today : भारतीय बाजारात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण येत असल्याने दागिने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत होती मात्र अचानक सोन्याच्या दरात वाढ झाल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. स्थानिक सुवर्णकारांकडून वाढलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळालेले सकारात्मक संकेत, यामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

‘ऑल इंडिया बुलियन असोसिएशन’नुसार, राजधानी दिल्लीत 99.9 % शुद्ध सोन्याच्या दरात 4,800 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. तर महाराष्ट्रात आज, 5 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 1,47,189 प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 1,35,503 प्रति 10 ग्रॅम आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम सुमारे ₹69.54, तर 22 कॅरेटमध्ये ₹64.02 वाढ नोंदवली आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरांकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

24 कॅरेट सोने: ₹14,718.89 प्रति ग्रॅम
22 कॅरेट सोने: ₹13,550.26 प्रति ग्रॅम
18 कॅरेट सोने: ₹11,094.64 प्रति ग्रॅम

अमेरिकेतील निवडणुका आणि जागतिक बाजारपेठेतील कल यांचा प्रभाव

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी तेजी दिसून येत आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत 113.72 डॉलर्सची (3%) वाढ होऊन ती प्रति औंस 4,043.93 डॉलर्सवर पोहोचली आहे, ज्यामुळे सोन्याने पुन्हा एकदा 4,000 डॉलर्सची महत्त्वाची पातळी ओलांडली आहे. त्याचप्रमाणे, चांदीच्या किमतीतही 4.5% वाढ होऊन ती प्रति औंस 52.03 डॉलर्सवर व्यवहार करत आहे.

NCP MLA : दिवाळीनंतर राज्यात राजकीय भूकंप? राष्ट्रवादीचे सर्व आमदार CM फडणवीसांना भेटणार

सोने आणि चांदी अचानक महाग का ?

या दरवाढीमागे देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांचा हात आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ कमोडिटी विश्लेषक सौमिल गांधी यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील जोरदार सुधारणा आणि देशांतर्गत सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या किमती वधारल्या आहेत.

follow us