गुजरातमध्ये H3N2 विषाणू ठरला घातक, वडोदरा शहरात पहिला मृत्यू
अहमदाबाद : भारतात H3N2 विषाणून आपला प्रकोप दाखवण्यास सुरूवात केली आहे. या विषाणूमुळे कर्नाटक आणि हरियानामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आता गुजरातमध्येही H3N2 मुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील वडोदरा शहरातील एका ५८ वर्षीय महिलेला दोन दिवसांपूर्वी श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. त्यामुळे त्या महिलेला शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयाचत उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी H3N2 विषाणूमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. राज्यात H3N2 मुळे झालेला हा पहिला मृत्यू असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात दोन दिवसांपूर्वी सुरतमध्ये कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. राज्यात H3N2 प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने आता कोविड रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
महिला फतेगंजमध्ये राहणारी
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील फतेगंज भागात राहणाऱ्या ५८ वर्षीय महिलेला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे होती. यानंतर त्यांना उपचारासाठी शहरातील एसएसजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच आरोग्य विभागाने सतर्कता वाढवली आहे. महिलेच्या कुटुंबीयांचे नमुने घेण्यात आले. जेणेकरून महिलेच्या घरातील अन्य सदस्यांना संसर्ग झाला आहे की नाही याची खात्री करता येईल.
…तर तुम्ही चाचणी करा.
आरोगतज्ज्ञ सांगत आहेत की, H3N2 विषाणू हा इन्फ्लूएंझा A च्या H1N1 चा म्युटेट व्हेरिएंट प्रकार आहे, जो कोणत्याही वयोगटातील किताही वर्षाच्या व्यक्तीला संक्रमित करू शकतो. तुम्हाला कोरडा खोकला, अंगदुखी असेल आणि आराम मिळत नसेल, तर H3N2 साठी चाचणी करावी. सीडीसाच्या मते, या विषाणूची लक्षणे इतर कोणत्याही हंगामी फ्लूसारखी असू शकतात, ज्यात खोकला, नाक वाहणं, मळमळ, अंगदुखी उलट्या आणि अतिसार याचा समावेश असू शकतो. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप यांना हलक्यात घेऊ नका.
पक्षीप्रेमी पुणेकरांनो सावधान! पारव्यांना दाणे टाकल्यास 500 रुपये दंड
हा विषाणू जीवघेणा ठरत आहे. बदलत्या वातावरणात फ्लूचे रुग्ण आढळतात, असे तज्ज्ञ सांगत आहेत, मात्र यावर्षी सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली आहे. अशा परिस्थितीत व्हायरल इन्फेक्शनची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. असे मानलं जात होते की, कोरोनानंतर इन्फ्लूएंझासारखे आजार कमी होतील, परंतु व्हायरल इन्फेक्शन वाढत आहे. त्यामुळे श्वसनसंस्थेवर परिणाम होतो.