समोसा अन् जिलेबीचा समावेश हानिकारक पदार्थांच्या यादीत होणार, मोदी सरकारचा प्लॅन नेमका काय?

Eating Samosa and Jilebi as harmful as cigarettes? Health Ministry’s big step : फास्ट फुड हे आरोग्यास घातक आहे. हे वेळोवेळी तज्ज्ञांकडून सांगितलं जात. पण त्यावर नियंत्रण ठेवणे अनेकदा आपल्याला जमत नाही. मात्र आता आपण नेहमी खात असलेल्या एका फास्टफुडसह जिलेबी देखील आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करणाऱ्या पदार्थांच्या यादीमध्ये आहे. त्यावर आता थेट आरोग्य मंत्रालयाकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.
बीडच्या माजलगाव तालुक्यात दोन गटांत हाणामारी; जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार
समोसा, जिलेबी आणि चाय-बिस्कीट म्हटलं की, प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. पण या पदार्थांमुळे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे आता तुम्ही या पदार्थांचं सेवन करणार का? त्यामुळे आता नागपूरमध्ये समोसा आणि जिलेबीच्या दुकानाबाहेर धोक्याचा इशारा देणारा बोर्ड लावण्यात आला आहे. जेणे करून लोकांना कळेल की, ते खात असलेल्या पदार्थांमध्ये किती प्रमाणात साखर आहे.
शानदार गोलंदाजी अन् बेन डकेटची विकेट तरीही मोहम्मद सिराजवर मोठी कारवाई; जाणून घ्या प्रकरण
नुसकचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, या सारख्या नाश्त्यामुळे तुमचं शरीर अनेक आजारांचं शिकार होतं आहे. त्यासाठी ज्या प्रमाणे तंबाखू आणि सिगारेटच्या पाकिटांवर धोक्याचा इशारा दिला जातो. त्याचप्रामाणे आता समोसा आणि जिलेबीबाबत देखील केले जाणार आहे. त्याच नियमाच पालन करत नागपूरमध्ये समोसा आणि जिलेबीच्या दुकानाबाहेर धोक्याचा इशारा देणारा बोर्ड लावण्यात आला आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, सावधानता बाळगून खा, तुमचं भविष्य तुमचे आभार मानेल.
पहिल्या कन्नड महिला सुपरस्टार बी सरोजा देवींचं निधन; वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
याबाबत आरोग्य मंत्रालयाने एम्स नागपूरसह सर्व केंद्रिय संस्थांना आदेश दिले आहेत. असे पोस्टर त्या संस्थांमध्ये लावण्यात यावेत. जेणे करून लोकांना स्पष्ट कळेल की, त्यांच्या दररोजच्या नाश्त्यामध्ये किती प्रमाणात फॅट आणि साखर आहे. जी आपल्या शरीराला हानिकारक आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाकडून लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या, पोलीस महासंचालकांकडे तक्रार; भडकाऊ भाषण केल्याचा आरोप
याबाबत एम्स नागपूरच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लाडू, वडापाव, भजे या सर्व स्नॅक्सची सध्या तपासणी केली जात आहे. तसेच कॅफेटेरिया आणि सार्वजनिक ठिकाणी याबाबत लवकरच बोर्ड लावले जाणार आहेत. कारण आरोग्य तज्ञांचं म्हणणं आहे की, स्नॅक्समधून शरीरात जाणारी साखर आणि ट्रान्स फॅट हे तंबाखू एवढे हानिकारक असू शकतात. त्यामुळे लोकांना ते काय खात आहेत? हे माहिती असणे गरजेचे आहे.
प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरण विधानसभेत; विरोधक आक्रमक, मुख्यमंत्री काय म्हणाले?
तर मधुमेह विशेषज्ञांनी सांगितलं की, सरकार या सर्व पदार्थांवर बंदी आणत नाही, तर लोकांना त्यांच्या आरोग्य विषयी सतर्क करत आहे. सरकारला हे करणे गरजेचे आहे, कारण आजच्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त आजार हे चुकीच्या आहारातून होत आहेत. तसेच सरकारने लठ्ठपणा बाबत देखील इशारा दिला आहे. की 2050 पर्यंत 40 कोटी हून अधिक लोक लठ्ठपणाचे आणि अतिरिक्त वजनाचे शिकार होऊ शकतात. त्यामुळे अमेरिके नंतर भारताचा नंबर लागू शकतो. सध्या देशात दहा पैकी दोन लोक हे लठ्ठपणाने त्रस्त आहेत. लहान मुलांना ती देखील हे प्रमाण वाढत आहे.