बीडच्या माजलगाव तालुक्यात दोन गटांत हाणामारी; जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार

Beed Crime News : बीडच्या माजलगाव तालुक्यातील केसापुरी (Beed) येथील जायकोबा राठोड, रमेश राठोड आणि त्यांचा चुलत भाऊ बाळू राठोड यांच्यामध्ये 8 जुलै रोजी वाद झाला. यावेळी तलवार आणि लाठ्या-काठ्यांनी मारहाण झाली. या घटनेचा व्हायरल झाला होता. या प्रकरणात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.
मारहाण झाल्यानंतर जखमी रमेश राठोड आणि बाळू राठोड यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. बाळू राठोडला भेटण्यासाठी शेजारच्या निपाणी टाकळी गावचा उपसरपंच लक्ष्मण चव्हाण हा जिल्हा रुग्णालयात आला होता. यावेळी रुग्णालयाच्या गेटवर तू बाळू राठोड सोबत कसा काय आला ? असा जाब विचारत आपल्यालाच मारहाण झाल्याचा दावा करत उपसरपंच लक्ष्मण चव्हाण याने जायकोबा राठोड याच्यावर आरोप केलाय. जायकोबा राठोड याने आपल्यालाच तिघांनी मारहाण केल्याचं सांगितलं आहे. याप्रकरणी जायकोबा राठोड याच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडच्या गुन्हेगारीचा रोज एक अंक; जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची मारहाण, तरुण रक्तबंबाळ
त्याचबरोबर जायकोबा राठोडच्या आरोपानुसार माजलगाव तालुक्यातील जय महेश कारखाना परिसरातील मुख्य रस्त्यावर उपसरपंच लक्ष्मण चव्हाण आणि इतरांनी आपण बीड शहर पोलिसात केलेल्या तक्रारीमुळे लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. सध्या त्याच्यावर बीडच्या खासगी कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या मारहाणीच्या घटनेनंतर 11 जुलै रोजी निपाणी टाकळी येथील ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेत आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवल्याने निपाणी टाकळी गावचे सरपंच भगवान राठोड, जायकोबा राठोड आणि इतरांनी मारहाण केली असा आरोप उपसरपंच लक्ष्मण चव्हाण याने केला आहे.
दरम्यान निपाणी टाकळी गावचे सरपंच भगवान राठोड यांनी पोलिसांना निवेदन देत आपला या प्रकरणाशी संबंध नसून राजकीय द्वेषापोटी खोटे आरोप करून आपल्याला बदनाम केलं जात असल्याचं म्हटलंय. तर उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना अमानुष मारहाण झाल्यानंतर त्यांच्या गटाच्या लोकांनी आपल्याला उचलून नेऊन बेदम मारहाण केल्याचा दावा विष्णू राठोड या जायकोबा राठोडच्या गटातील व्यक्तीने केला आहे. दरम्यान उपसरपंच लक्ष्मण चव्हाण, तरुण विष्णू राठोड यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, घडलेल्या या सर्व घटना भर रस्त्यावर आणि भर दिवसा घडलेल्या आहेत आणि मारहाण करणाऱ्या व्यक्तींनी व्हिडिओ काढत मारहाण केलेली आहे.