“मेलेडी इतनी चॉकलेट्टी क्यूँ है?”… मोदी-मेलोनीच्या व्हिडिओमुळे 80 च्या दशकातील टॉफी पुन्हा चर्चेत

History Of Parle Melody चॉकलेटच्या आतल्या भागात मऊ आणि रिच चॉकलेट क्रीम त्यामुळे बाजारात येताच या चॉकलेटने अबालवृद्धांना वेड लावले

  • Written By: Published:
मेलेडी इतनी चॉकलेट्टी क्यूँ है?"... मोदी-मेलोनीच्या व्हिडिओमुळे 80 च्या दशकातील चॉकलेट पुन्हा चर्चेत

History Of Parle Melody Chocolate : “मेलेडी इतनी चॉकलेट्टी क्यूँ है? मेलेडी खाओ, खुद जान जाओ…” 80 आणि 90 च्या दशकातील ही सुपरहिट जाहिरात आणि ते चवदार चॉकलेट आजही आपल्या प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळत आहे. पण, सध्या हेच भारताचे लाडके ‘मेलेडी’ चॉकलेट आंतरराष्ट्रीय राजकारणामुळे थेट जागतिक पातळीवर चर्चेत आले आहे. त्याचं झालं असंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटली दौऱ्यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भारताचे प्रसिद्ध ‘पार्ले मेलेडी’ चॉकलेट गिफ्ट केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमका या चॉकलेटचा इतिहास काय? त्याबद्दल जाणून घेऊया..

‘कॉकरोच जनता पार्टी’चा धुमाकूळ! सरन्यायाधीशांनी ‘झुरळ’ म्हटलं अन् मराठी तरुणाने थेट पक्षच काढला

‘पार्ले’ने कधी सुरू केली मेलेडी?

भारतात बिस्कीट आणि चॉकलेट विश्वात क्रांती घडवणाऱ्या ‘पार्ले’ (Parle) कंपनीने 1983 मध्ये ‘मेलेडी’ चॉकलेट बाजारात लाँच केले होते. तो असा काळ होता जेव्हा भारतात मोजकीच चॉकलेट्स उपलब्ध होती. अशा काळात पार्लेने ग्राहकांसाठी एक वेगळा प्रयोग करायचे ठरवले.

‘ड्युअल फ्लेवर’ची पहिली जादू

मेलेडी हे भारतातील पहिले असे चॉकलेट होते जे ‘ड्युअल फ्लेवर’ ने बनवले गेले होते. या चॉकलेटच्या बाहेरच्या बाजूला कॅरॅमलचे कडक आवरण असायचे. तर चॉकलेटच्या आतल्या भागात मऊ आणि रिच चॉकलेट क्रीम भरलेली असायची. या अनोख्या चवीमुळे बाजारात येताच या चॉकलेटने अबालवृद्धांना वेड लावले.

“मेलेडी इतनी चॉकलेट्टी क्यूँ है?” ची ती ऐतिहासिक जाहिरात

मेलेडी चॉकलेट जितके त्याच्या चवीमुळे हिट झाले, तितकेच ते त्याच्या जाहिरातीमुळे घराघरात पोहोचले. 90 च्या दशकात टीव्हीवर आलेली याची जाहिरात भारतीय जाहिरात क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात यशस्वी जाहिरात मानली जाते. जाहिरातीत एक मुलगा विचारतो की, “मेलेडी इतनी चॉकलेट्टी क्यूँ है?” त्यावर समोरून उत्तर मिळते: “मेलेडी खाओ, खुद जान जाओ”. या एका साध्या पण प्रभावी संवादाने लोकांमध्ये इतकी उत्सुकता निर्माण केली की, प्रत्येक जण या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मेलेडी चॉकलेट विकत घेऊ लागला आणि पार्लेचा खप एका रात्रीत कोट्यवधींच्या घरात गेला.

लग्नानंतर मुलींची फिगर का बिघडते? वाचा, ‘ते’ 8 बदल जे मुलींच्या वजनाचा काटा हलवतात…

1 रुपयात 2 चॉकलेटचा सुवर्णकाळ

80 आणि 90 च्या दशकात लहानांपासून मोठ्यांपर्यंत खिशात हक्काने जागा मिळवणारे हे चॉकलेट होते. त्यावेळी अवघ्या 50 पैशांना एक म्हणजेच 1 रुपयात 2 मेलेडी मिळायच्या. वाढदिवसाला शाळेत मित्रांना वाटण्यासाठी किंवा दुकानात सुटे पैसे नसताना हक्काने दिले जाणारे चॉकलेट म्हणून मेलेडीने भारतीय संस्कृतीत एक अढळ स्थान निर्माण केले. बदलत्या काळानुसार महागाई वाढली तरी पार्लेने या चॉकलेटची चव आणि दर्जा कायम राखला.

‘मेलेडी’ आता ग्लोबल

जी मेलेडी कधीकाळी मुंबईच्या पार्ले भागात तयार होऊन गल्लीबोळातील दुकानांमध्ये विकली जायची, ती आज पंतप्रधान मोदींच्या डिप्लोमसीमुळे आणि सोशल मीडियाच्या ‘मेलेडी’ ट्रेंडमुळे जागतिक पातळीवर चर्चेचा विषय बनली आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भारताची ही गोड चव नक्कीच आवडली असेल यात शंका नाही. त्यामुळे आता इंटरनेटवर पुन्हा तोच जुना प्रश्न विचारला जात आहे “Melodi इतनी चॉकलेट्टी क्यूँ है?” आणि त्याचे उत्तर आता संपूर्ण जगाला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)

follow us