सिडनीमधील बेछूट गोळीबाराने जगभरात हळहळ; पंतप्रधान मोदींनीही व्यक्त केल्या संवेदना

सिडनी येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया

  • Written By: Published:
Untitled Design (109)

Australia Bondi Beach Sydney Shooting : ऑस्ट्रेलियातील सिडनी(Sydney) शहरातील बोंडी समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या भीषण गोळीबाराच्या(Horrible Firing) घटनेने संपूर्ण जग हादरले आहे. ज्यू समुदायातील नागरिक हनुक्का सणाच्या निमित्ताने रात्रीच्या वेळेस उत्सव साजरा करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. हनुक्का उत्सव यंदा 14 डिसेंबरपासून सुरू झाला असून 22 डिसेंबरपर्यंत हा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्त हजारो ज्यू नागरिक बोंडी बीच(Boundi Beach) परिसरात एकत्र जमले होते.

या गोळीबारात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, काही जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत गोळीबार करणाऱ्या दोघा आरोपींना अटक केली आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया दिली आहे. “ऑस्ट्रेलियातील बोंडी बीचवर ज्यू लोकांच्या हनुक्का सणाच्या पहिल्या दिवशी उत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो.

भारताच्या जनतेच्या वतीने, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्या कुटुंबांप्रती मी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. या दुःखद प्रसंगी भारत ऑस्ट्रेलियाच्या जनतेसोबत खंबीरपणे उभा आहे. भारताचे दहशतवादाबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण आहे आणि दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरोधातील लढ्याला आम्ही पाठिंबा देतो,” असे स्पष्ट मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले.

 

दरम्यान, या घटनेचा एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गोळीबार सुरू असतानाच एका धाडसी व्यक्तीने जीव धोक्यात घालून हल्लेखोराला पकडल्याचे दिसून येते. गोळीबार सुरू असताना लोक सैरावैरा पळताना दिसत आहेत. अशाच परिस्थितीत पांढरा शर्ट घातलेला एक व्यक्ती कारच्या आडोशाने हळूहळू पुढे जातो आणि क्षणाचाही विलंब न करता गोळीबार करणाऱ्या व्यक्तीवर पाठीमागून झडप घालतो.

फुटबॉलचा बादशाह वानखेडे स्टेडियमवर; मेस्सीची एन्ट्री होताच चाहत्यांचा एकच जल्लोष

दोघांमध्ये जोरदार झटापट होते आणि अखेर त्या धाडसी व्यक्तीने हल्लेखोराच्या हातातील रायफल हिसकावून त्याला निरुत्तर केले. पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी घडलेला हा प्रसंग अनेकांच्या अंगावर काटा आणणारा ठरत असून, संबंधित व्यक्तीच्या धैर्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

 

Tags

follow us