फुटबॉलचा बादशाह वानखेडे स्टेडियमवर; मेस्सीची एन्ट्री होताच चाहत्यांचा एकच जल्लोष

मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी फुटबॉल चाहत्यांनी स्टेडियममध्ये आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 14T184711.069

अर्जेंटिनाला आपल्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकून देणारा दिग्गज आणि स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे. (India) मेस्सीने भारत दौऱ्याची सुरुवात कोलकातातून केली. मेस्सीने कोलकातात आपल्या पुतळ्यातं व्हर्च्युअल उद्घाटन केलं. त्यानंतर आता मेस्सी भारत दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी मुंबई दौऱ्यावर आहे.

मेस्सीचं मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये चाहत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी फुटबॉल चाहत्यांनी स्टेडियममध्ये आणि आसपासच्या परिसरात तोबा गर्दी केली आहे. तसेच स्वागतानंतर लिओनेल मेस्सी याच्या हस्ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रोजेक्ट महादेवाचं उद्धाघटन करण्यात आलं आहे.

मेस्सीला भारतात आणणाऱ्या आयोजकला अटक; जाणून घ्या, कोण आहे सताद्रु दत्ता?

मेस्सीची चाहते गेल्या तासाभरापासून वाट पाहत होते. मेस्सीची जवळपास 6 वाजता वानखेडे स्टेडियममध्ये एन्ट्री झाली. फुटबॉलचा देव क्रिकेटच्या पंढरीत येता चाहत्यांनी मेस्सी मेस्सी, असा जयघोष करत स्टेडियम दणाणून सोडला. त्यानंतर मेस्सीने टीम इंडियाचा दिग्गज फुटबॉलर सुनील छेत्री याची भेट घेतली. मेस्सी आणि सुनील या दोघांनी एकमेकांना मिठी मारली.

फुटबॉलला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या’प्रोजेक्ट महादेवा’चं मेस्सीच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलं. यावेळेस मेस्सीने 60 खेळाडूंना स्कॉलरशीप दिली. यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सनदी अधिकारी प्रवीण परदेशी उपस्थित होते. प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत 60 गुणवंत खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

या प्रोजेक्ट महादेवाअंतर्गत निवड करण्यात आलेल्या अंडर 13 फुटबॉलपटूंना मेस्सी फुटबॉलचे धडे देणार आहेत. प्रोजेक्ट महादेवा’चं शुभारंभ करण्यात आल्यानंतर मेस्सीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन्मानित केलं. मुख्यमंत्र्‍यांनी यावेळेस मेस्सीला स्मृतीचिन्ह दिलं.

follow us