Manish Sisodia यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

Manish Sisodia यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

Manish Sisodia Judicial Custody: सीबीआयने मद्य धोरण प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांची Manish Sisodia) 26 फेब्रुवारीला 8 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. ते सध्या तिहार जेलमध्ये आहेत. अगोदर ते 7 दिवस पोलीस तर त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर अद्याप देखील सिसोदियांना दिलासा मिळालेला नाही.

माजी सीएम मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांची न्यायालयीन कोठडी पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. राउज अॅव्हेन्यू कोर्टाने आज 17 एप्रिलला सिसोदियांची न्यायालयीन कोठडी सीबीआय प्रकरणी 27 एप्रिलपर्यंत आणि ईडी (ED) प्रकरणी 29 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. या प्रकरणात मनीष सिसोदियांसह आरोपी अरुण रामचन्द्र पिल्लई आणि अमनदीप ढल यांची देखील न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे.

दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणी सीबीआयने नोटीस बजावली होती. यानुसार त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होत. 16 एप्रिलला सकाळी 11 वाजता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी केली गेली. तब्बल 9 तास ही चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीनंतर केजरीवालांनी माहिती दिली आहे.

Arvind Kejariwal: केंद्र सरकाकडून केजरीवालांच्या अटकेचा कट, आपचा आरोप

केजरीवाल म्हणाले की, ‘सीबीआयने माझी जवळपास साडे नऊ तास चौकशी केली. मी सर्व प्रश्नांची उत्तरं दिले. मात्र कथित मद्य धोरण केस खोटी आणि घृणास्पद आहे. केंद्र सरकार आम आदमी पार्टीला संपवायचा प्रयत्न करत आहे. पण देशातील जनता आमच्या सोबत आहे.’

दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी सीबीआय समोर अरविंद केजरीवाल हे चौकशीसाठी हजर होण्याच्या एक दिवस आधी आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये खासदार राघव चढ्ढा म्हणाले की, अरविंद केजरीवाल हे आजचे महात्मा गांधी आहेत आणि अरविंद केजरीवाल त्यांना संपवतील हे भाजपला माहीत आहे. यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आम आदमी पक्ष राजकीय दृष्ट्या संपवून टाकायचा आहे. पण ते केजरीवाल यांच्या केसालाही धक्का लावू शकणार नाहीत. कारण ‘आप’ हा चळवळीतून जन्माला आलेला पक्ष आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube