सर्वात मोठी बातमी, लाहोरमध्ये भारतीय सैन्याकडून ड्रोन हल्ले सुरु

Drone Attacks : भारतीय सैन्याकडून पाकिस्तानमधील लाहोर येथे ड्रोन हल्ले सुरु करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीर येथे सुरु असलेल्या हल्ल्यांना भारताकडून प्रत्युत्तर म्हणून लाहोरमध्ये भारतीय सैन्याकडून ड्रोन हल्ले करण्यात येत आहे. काहीवेळापूर्वी पाकिस्तानकडून जम्मू आणि आणखी काही ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात येत आहे. मात्र भारताच्या एस 400 सिस्टिमने सर्व ड्रोन हल्ले परतवून लावले आहेत.
माहितीनुसार, पाकिस्तानकडून जम्मू विमानतळ आणि रेल्वे स्टेशनवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सध्या जम्मू विमानतळ हाय अलर्ट मोडवर आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याच्या एअर डिफेन्स युनिट्सने पाकिस्तानचे एफ 16 फायटर जेट पाडले. ही कारवाई एलओसी जवळ झाली. पाकिस्तानी फायटर जेट भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी या विमानाला हाणून पाडण्यात आले. भारताने पाकिस्तानची एकूण तीन विमाने पाडल्याची माहिती समोर येत आहे. यात एक एफ 16 आणि दोन जेएफ 17 विमानांचा समावेश आहे.
मोठी बातमी! IPL 2025 पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबला
तर दुसरीकडे पाकिस्तानने जैसलमेर येथे ड्रोन हल्ला केल्यामुळे आयपीएल सामना अचानक रद्द करण्यात आला आहे. माहितीनुसार, जैसलमेरमध्ये पाकिस्तानने 30 पेक्षा जास्त मिसाईल डागले आहे. मात्र या हल्ल्यात भारताचे कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.