मोठी बातमी! भारताच्या INS विक्रांत युद्धनौकेचा कराची बंदरावर हल्ला

मोठी बातमी! भारताच्या INS विक्रांत युद्धनौकेचा कराची बंदरावर हल्ला

Karachi Port : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढले असून पाकिस्तानकडून भारतातील अनेक शहरात हल्ले करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहे. तर आता या हल्ल्याना भारताकडून देखील प्रत्युत्तर देण्यात येत आहे. माहितीनुसार, भारताने पाकिस्तानातील कराची, लाहोर आणि इस्लामाबाद येथे हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.

तर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार भारताकडून कराची बंदरावर हल्ले करण्यात येत आहे. माहितीनुसार, भारताच्या INS विक्रांत युद्धनौकेने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यानंतर कराची बंदरावर 10 स्फोटांचे आवाज ऐकू आले आहे.

तर दुसरीकडे भारताने गुरुवारी पाकिस्तानच्या लाहोर, मुलतान, सरगोधा, फैसलाबाद येथे हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली आहे. आज पाकिस्तानकडून देशातील अनेक शहरात हल्ले करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते मात्र जे भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी हाणून पाडले.

8 हजार पाकिस्तानी अकाउंट बंद करण्याचे आदेश

भारत सरकारने एक्स ला आदेश देत भारतात 8 हजार पाकिस्तानी अकाउंट बंद करण्याचे आदेश दिले आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानकडून येणारी चुकीची  माहिती  थांबवण्यासाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेत  ‘एक्स’ ला देशातून 8 हजार अकाउंट बंद करण्याचे आदेश दिले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या