5 वेळा नसबंदी तरीही अडीच वर्षांत 25 वेळा बनली आई प्रकरण वाचून डोकं गरगरेल

5 वेळा नसबंदी तरीही अडीच वर्षांत 25 वेळा बनली आई प्रकरण वाचून डोकं गरगरेल

Janani Suraksha Yojana Scam : केंद्र सरकारसह देशातील विविध राज्यातील सरकारे लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या योजना राबवत आहे. मात्र उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रा (Agra) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामुळे केवळ उत्तर प्रदेशात नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, आग्रा येथील एका महिलेने पाच वेळा नसबंदी केली पण अडीच वर्षांत ती 25 वेळा आई झाली. इतकंच नाहीतर या महिलेला सरकारकडून 45 हजार रुपये देखील देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार उत्तर प्रदेशात जननी सुरक्षा योजना (Janani Suraksha Yojana) आणि स्त्री नसबंदी प्रोत्साहन योजनेतील (Mahila Sterilization Promotion Scheme) घोटाळा समोर आला आहे. या योजनेत एका महिलेच्या नावावर अडीच वर्षात 25 प्रसूती आणि पाच नसबंदी दाखवण्यात आली आहे तसेच या महिलेला 45 हजार रुपयेही देण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाने आग्रा येथील सीएचसी फतेहाबादचे नियमित ऑडिट केल्यानंतर समोर आली आहे.

तर दुसरीकडे या घोटाळ्यामागे एका दलालाचे नाव समोर आले आहे. या दलालाने या योजनेत अनेक महिलांचे खाते उघडले आहे मात्र यामध्ये नाव, पत्ता आणि खाते नंबर महिलांचे आहेत पण मोबाईल नंबर दलालाचा आहे. जेव्हा जेव्हा सरकारकडून या योजनेत पैसे येतात तेव्हा दलालाच्या नंबरवर अलर्ट येतो आणि त्यानंतर दलाल पैसे काढत होता.

सरकारकडून 2021-22 आणि 2022-23  या आर्थिक वर्षांचे ऑडिट करण्यात आले आणि यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जननी सुरक्षा योजना आणि स्त्री नसबंदीमधील घोटाळा उघडकीस आला. सीएचसी फतेहाबादच्या ऑडिट दरम्यान, टीमला सिकाराराच्या रहिवासी लाभार्थी कृष्णा कुमारीचा रेकॉर्ड अनेक वेळा सापडला. त्यात गेल्या अडीच वर्षांत तिच्या 25 बाळंतपणा आणि पाच नसबंदी दाखवल्या आहेत.

डिजिटल मंत्रिमंडळासाठी फडणवीस सरकारचा कोटींचा घाट; पण, RTI कार्यकर्ते कुंभारांनी ठेवलं ‘मर्मा’ वर बोट

सोमवारी आरोग्य विभागाला याची माहिती मिळाल्यावर, सीएमओ डॉ. अरुण श्रीवास्तव यांनी चौकशीचे आदेश दिले. कृष्णा कुमारीच्या चौकशीदरम्यान असे उघड झाले की ती या योजनेचा लाभ घेत नाही मात्र तिच्या नावावर एका व्यक्तीने या योजनेत खाते उघडले होते. तसेच या योजनेत कृष्णा कुमारी मोबाईल नंबर देखील फेक असल्याची माहिती समोर आली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube