पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 3 रुपयांनी महाग; इंधनाचे दर शंभरीपार, कच्चं तेलही 100 डॉलरच्या पुढे

इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल बाजारातील अस्थिरता वाढली असताना जिओ-बीपीनं पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 5 रुपये वाढ.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 12T174636.138

Jio BP Petrol Diesel Price Hike : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा (India) परिणाम जागतिक तेल बाजारावर होत असून कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांमुळे अनेक देशांमध्ये इंधन महागाईचा दबाव वाढला आहे. तेल पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यानं भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबत चिंता वाढली आहे. रिलायन्स समूहाच्या जिओ-बीपी कंपनीनं रविवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 5 रुपये, तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ केली. मीडिया रिपोर्टनुसार, या दरवाढीनंतर पंजाबमध्ये पेट्रोलचा भाव 108.54 रुपये, तर डिझेलचा दर 99.19 रुपये प्रतिलिटरवर पोहोचला आहे.

यापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी नायरा एनर्जीनंही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली होती. आता जिओ-बीपीनं दर वाढवल्यानं खासगी इंधन कंपन्यांकडून ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. मात्र, सरकारी तेल कंपन्यांनी अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे दर चढे राहिल्यास सरकारी कंपन्यांवरही दरवाढीचा दबाव येऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Toyota Fortuner Leader Edition लॉन्च; सिग्नेचर फ्रंट ग्रिलसह भन्नाट फीचर्स; जाणून घ्या किंमत

इराण-अमेरिका संघर्ष सुरू झाल्यापासून सरकारी तेल कंपन्यांवरील आर्थिक ताण वाढला आहे. यापूर्वी मे महिन्यात सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 7.50 रुपयांची वाढ केली होती. देशातील एक लाखांहून अधिक पेट्रोल पंपांपैकी मोठा हिस्सा सरकारी तेल कंपन्यांच्या नियंत्रणाखाली आहे. दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर 100 डॉलरच्या आसपास पोहोचले आहेत. त्यातच सौदी अरेबियाच्या जहाजावर हुथी बंडखोरांनी हल्ला केल्याच्या वृत्तामुळे या भागातील तणाव आणखी वाढला आहे.

या घडामोडींनंतर सोमवारी ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल 103.63 डॉलरच्या आसपास पोहोचल्या. मध्यपूर्वेतील तणाव कायम राहिल्यास कच्च्या तेलाच्या दरांमध्ये चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय तेल कंपन्या आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणार का, याकडे लक्ष लागलं आहे. आगामी निवडणुकांचा विचार करता इंधन दरवाढीबाबत सरकारची भूमिका काय असेल, याबाबतही चर्चा सुरू आहे.

follow us