कर्नाटक निवडणुकीचे बिगुल वाजणार; थोड्याच वेळात EC करणार तारखांची घोषणा

कर्नाटक निवडणुकीचे बिगुल वाजणार; थोड्याच वेळात EC करणार तारखांची घोषणा

कर्नाटक विधानसभेसाठीचे रणशिंग आज फुंकले जाणार आहे. भारतीय निवडणूक आयोग आज सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन त्याच्या तारखा जाहीर करणार आहे. कर्नाटकमधील 224 जागांसाठी एप्रिलमध्ये निवडणूक होऊ शकते. सध्या कर्नाटकमध्ये भाजप सरकार असून 24 मे रोजी त्यांच्या सरकारचा कार्यकाळ संपणार आहे.

2018 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला होता. यानंतर येदियुरप्पा 17 मे 2018 रोजी मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांमध्येच त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्यानंतर बसवाज बोम्मई हे मुख्यमंत्री झाले होते.

स्थानिक स्वराज्य संस्थाची सुनावणी ३ आठवड्यांनी पुढे; निवडणुका पावसाळ्यानंतर होणार?

आागामी निवडणुकीमध्ये भाजपने 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 वेळा कर्नाटकचा दौरा केला आहे. बीएस येदियुरप्पा यांचे वय सध्या 79 वर्ष असून त्यांना निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख बनवले जाऊ शकते.

नमो अ‍ॅप बनले हायटेक, आता पीएम मोदींसोबत घेता येणार फोटो

दरम्यान, काँग्रेसने निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच 25 मार्च रोजी 124 उमेदवारांची घोषणा केली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे वरुणा विधानसभेतून तर कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार हे कनकापुरातून निवडणूक लढवणार आहेत.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube