Karnataka Elections 2023: काँग्रेसमध्ये ‘इनकमिंग’, भाजप, जनता दलाचे अनेक आमदार संपर्कात ?

  • Written By: Published:
Karnataka Elections 2023: काँग्रेसमध्ये ‘इनकमिंग’, भाजप, जनता दलाचे अनेक आमदार संपर्कात ?

Karnataka Elections 2023: बंगळुरुः कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूकपूर्व चाचणीत काँग्रेस सत्तेत येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यात भाजपमधील काही जण काँग्रेसच्या संपर्कात आहेत. त्यात भाजपचे आमदार एन. वाई. गोपालकृष्ण यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीपूर्वी भाजप आणि जनता दल (एस) चे काही आमदार काँग्रेसमध्ये येतील, असा दावा कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला आहे

Kashmir : आतंकवादी संघटनेच्या निशाण्यावर RSS चे 30 नेते, तपास सुरु.

गोपालकृष्ण हे कुदलिगी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. काँग्रेस सत्तेत येईल, असा दावाही या आमदाराने केला आहे. गोपालकृष्ण यांनी गेल्या आठवड्यात भाजपचा राजीनामा दिलेला आहे. भाजप आणि जनता दलाचे काही नेते काँग्रेसमध्ये येणार आहेत. मतदार यंदा काँग्रेसला निवडून देणार आहे.


Letsupp Special : ठाकरे विरुद्ध फडणवीस : लाज वाटत नाही का? ते फडतूस!

गोपालकृष्ण यांच्याबरोबर जनता दल (एस) चे आमदार केएम शिवलिंगे गौडा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते ही लवकर काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याचे शिवकुमार यांनी सांगितले आहे.

हे नेते स्वच्छेने काँग्रेसमध्ये येत आहेत. राज्यातील डबल इंजिन सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे लोकांना परिवर्तन हवे असल्याचा दावा शिवकुमार यांनी केला आहे.


उद्धव ठाकरेंना कायमचं घरकोंबडा बनावं लागेल; बावनकुळेंनी धमकावलं

सहा वेळा आमदार राहिलेले गोपालकृष्ण मूळचे काँग्रेसचे आहेत. ते आतापर्यंत तीन वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आलेले आहे. चार वेळा चित्रदुर्ग जिल्ह्यातील मोलाकलमुरू विधानसभा मतदारसंघातून, एकदा बल्लारी मतदारसंघातून निवडून आले आहेत. ते भाजपमध्ये गेल्यानंतर ते कुदलिगी मतदारसंघातून निवडून आलेले आलेले आहे.

वर्ष 2018 मध्ये काँग्रेसने त्यांचे तिकीट कापले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले होते. काँग्रेसमध्ये आल्याने ते बल्लारी, चित्रदुर्ग आणि विजयनगर जिल्ह्यातील मतदारसंघात काम करणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube