दक्षिणेत काँग्रेसला आणखी एक धक्का; आंध्राचे माजी मुख्यमंत्र्यांचा भाजपात प्रवेश
Andhra Pradesh Former CM Kiran Kumar Reddy Joins BJP : दक्षिणेत काँग्रेसला बसणारे धक्कातंत्र काही केल्या थांबताना दिसून येत नाहीये. काल काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी (A. K. Antony) यांचा मुलगा अनिल अँटनी (Anil Antony) यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केल्यानंतर आज आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी क्रिकेटपटू किरण कुमार रेड्डी आता भाजपसाठी फलंदाजी करतील. ते रणजी स्तरापर्यंत क्रिकेट खेळले आहेत असे भाजपा प्रवेशानंतर पक्षाचे नेते प्रल्हाद जोशी म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत मला योगदान द्यायचे आहे, त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे रेड्डी यांनी म्हटले आहे.
#WATCH | Kiran Kumar Reddy, who served as the CM of united Andhra Pradesh, joins Bharatiya Janata Party in Delhi pic.twitter.com/WrlGjG5Uwr
— ANI (@ANI) April 7, 2023
दक्षिणेच्या राजकारणात पाय पसरण्याच्या तयारीत असलेल्या भाजपचे हे मोठे यश मानले जात आहे. किरण रेड्डी यांनी १२ मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राजीनामा पाठवला होता. तेव्हापासून किरण रेड्डी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. भाजपमध्ये प्रवेश करताना किरणकुमार रेड्डी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. कोणत्या नेत्याला कोणत्या पातळीवर कोणती जबाबदारी द्यायची हेच काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वाला समजत नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे पक्षातील अनेक नेत्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. एकेकाळी 400 हून अधिक जागा मिळवून आज काँग्रेस अस्तित्वासाठी झगडत आहे, तर एकेकाळी अवघ्या दोन जागा मिळविणारा भाजप पुढे सरकत आहे, यावरून काँग्रेसचे भवितव्य समजून घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.
Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी गुलाल उधळला; पहिल्या उमेदवाराचा दणदणीत विजय
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या सेवेत लोकांना आपल्याशी जोडण्याचा सतत प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे आपल्या लोकांना सुरक्षित ठेवण्यास कोणी असमर्थ आहे. भाजपचे संपूर्ण नेतृत्व राष्ट्र उभारणीच्या भावनेने पुढे जात आहे. पक्षश्रेष्ठींसोबतच भाजपचा सामान्य कार्यकर्ताही याच भावनेने पुढे जात आहे. ही भावना सहजासहजी येत नाही, यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दीर्घकाळ मेहनत करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. भाजपचे धोरण आणि दिशा पूर्णपणे स्पष्ट आहे. तो गरीब आणि तरुणांसाठी समर्पित असल्याचे ते म्हणाले.