लालू यादवांच्या अडचणी वाढल्या; ईडीच्या छाप्यात सापडलं मोठं घबाड

लालू यादवांच्या अडचणी वाढल्या; ईडीच्या छाप्यात सापडलं मोठं घबाड

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयानं (ED) शुक्रवारी (10 मार्च) नोकरीच्या बदल्यात जमीन (Land in exchange for employment)प्रकरणी विविध ठिकाणी छापे टाकले. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav)यांच्या मुली आणि जवळच्या सहकाऱ्यांच्या घरावर छापे (Raid)टाकले. या छापेमारीत ईडीच्या हाती काय-काय लागलं? हे त्यांनी आज (दि.11) ते सांगितलं.

छाप्यात 1 कोटी रुपये रोख, 1900 अमेरिकी डॉलर, सुमारे 540 ग्रॅम सोनं, 1.5 किलो सोन्याचे दागिने (सुमारे 1 कोटी 25 लाख रुपये किमतीचे) आणि काही कागदपत्रं सापडल्याचं ईडीनं सांगितलं आहे.

सोमय्यांचा घणाघात! म्हणाले, ठाकरेंच्या राज्यात अनिल परबांनी..

ईडीच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाच्या तपासादरम्यान, असं आढळलंय की, सुमारे 600 कोटी रुपयांपैकी 350 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता खरेदी केली. यातील बहुतांश जमीन तत्कालीन रेल्वेमंत्री लालू यादव यांच्यामार्फत भारतीय रेल्वेत नोकऱ्या देण्याच्या नावाखाली पाटणातील पॉश भागात चुकीच्या पद्धतीनं हडप केल्याचं तपासात समोर आलं आहे. आज त्याची किंमत 200 कोटी रुपये आहे.

ईडीनं सांगितलं की, तपासादरम्यान असं आढळून आलं की, जप्त केलेल्या जमिनीचे चार तुकडे असे आहेत की, ते ग्रुप डीच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी 7.5 लाख रुपयांना विकत घेतले होते. त्यानंतर आरजेडीचे माजी आमदार अबू दोजाना यांना साडेतीन कोटींना विकली गेली.

हे पैसे बहुतांशी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्या बँक खात्यात पाठवले गेले. अनेक रेल्वे झोनमध्ये नोकऱ्या मिळालेल्या लोकांपैकी 50 टक्क्यांहून अधिक लोक लालू यादव यांच्या कुटुंबातील विधानसभा मतदारसंघातील असल्याचा दावा ईडीनं केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube