डीजेचा ‘हाय व्होल्टेज’ राडा! वरातीतील आवाजाने 140 कोंबड्यांचा हाकनाक बळी; कुठे घडली घटना?

DJ Music एकीकडे लग्नाचा जल्लोष डीजेचा कानठळ्या बसवणारा आवाज पण याच आनंदाच्या वातावरणात एका पोल्ट्री फार्म मालकावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • Written By: Published:
डीजेचा 'हाय व्होल्टेज' राडा! वरातीतील आवाजाने 140 कोंबड्यांचा हाकनाक बळी कुठे घडली घटना?

Loud DJ Music Cause Killed 140 Chickens In UP Sultanpur Area : एकीकडे लग्नाचा जल्लोष डीजेचा कानठळ्या बसवणारा आवाज पण याच आनंदाच्या वातावरणात एका पोल्ट्री फार्म मालकावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डिजेच्या कर्णकर्कंश आवाजामुळे थोड्या थोडक्या नव्हे तर, 140 कोंबड्यांचा हाकनाक मृत्यू झाला आहे. नेमकी ही घटना कुठे घडली? प्राणी, पक्षी आणि मनुष्याला किती डिजेचा आवाज किती डेसिमलपर्यंत सहन होऊ शकतो याबद्दल जाणून घेऊया…

घटना कुठे घडली?

सुल्तानपूरच्या दरियापूर गावात 25 एप्रिल रोजी एका लग्नाची वरात साबिर अली यांच्या पोल्ट्री फार्मजवळून जात होती. साबिर यांच्या दाव्यानुसार, डीजेचा आवाज इतका प्रचंड होता की, फार्ममधील कोंबड्या अस्वस्थ झाल्या आणि थोड्याच वेळात या सर्व कोंबड्यांनी प्राण सोडले. तज्ज्ञांच्या मते, पक्ष्यांमध्ये मानवाच्या तुलनेत ‘नॉईज फोबिया’ (आवाजाची भीती) जास्त असतो. ही घटना ऐकायला जरी विचित्र वाटत असली, तरी त्यामागे दडलेले विज्ञानाचे वास्तव अत्यंत भीतीदायक आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियावर ‘ध्वनी प्रदूषण’ आणि त्याच्या घातक परिणामांची चर्चा रंगू लागली आहे.

मोठा आवाज कोंबड्यांसाठी एखाद्या शारीरिक धक्क्यासारखा (Shock) असतो. यामुळे त्यांच्या शरीरात ‘ॲड्रेनालाईन’ हार्मोनचे प्रमाण अचानक वाढते, ज्यामुळे हृदयाचे ठोके अनियंत्रित होऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो. तसेच अचानक येणाऱ्या मोठ्या आवाजामुळे पक्षी प्रचंड तणावाखाली येतात. याला विज्ञानात ‘सडन डेथ सिंड्रोम’ असेही म्हटले जाते.

माणसांसाठी किती डेसिमलचा आवाज घातक?

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा जास्त आहे की नाही हे डेसिबल (dB) मध्ये मोजले जाते. उदाहरणार्थ, सामान्य श्वासोच्छ्वासाचा आवाज 10 dB असतो आणि विमान उड्डाण करतानाचा आवाज 140 dB असतो. मोठा आवाज केव्हा आणि कसा जीवघेणा ठरतो? या प्रश्नाचे उत्तर आवाजाच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. जर आवाजाची पातळी 120 dB या उच्च-धोक्याच्या मर्यादेपेक्षा जास्त झाली, तर मृत्यूचा धोका वाढतो. हा धोका का वाढतो, तर, 90-120 dB च्या आवाजाच्या पातळीमुळे ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते, परंतु 120 dB पेक्षा जास्त आवाजामुळे कानाचा पडदा फाटू शकतो आणि मृत्यूही ओढवू शकतो.

सततच्या मोठ्या आवाजामुळे मानवी शरीरावरही गंभीर परिणाम होतात. ज्यामध्ये सततचा आवाज मेंदूला ‘हाय अलर्ट’वर ठेवतो, ज्यामुळे झोप न येणे, चिडचिडेपणा आणि नैराश्याची समस्या उद्भवू शकते. याशिवाय सततचा मोठा आवाज थेट रक्तदाब वाढवतो, जो हृदयविकाराच्या रुग्णांसाठी अत्यंत धोक्याचा ठरू शकतो. तसेच 85 डेसिबलपेक्षा जास्त आवाज दीर्घकाळ ऐकल्यास कानाच्या आतील नाजूक पेशी कायमच्या निकामी होण्याचाही धोका वाढतो.

follow us