AI चा फटका! 60 हजार कर्मचाऱ्यांना ऐच्छिक निवृत्ती…मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय, भारतीय IT क्षेत्र चिंतेत…

एआय वरील गुंतवणूक वाढवण्यासाठी मायक्रोसॉफ्टने 60 हजार कर्मचाऱ्यांना ऐच्छिक सेवानिवृत्ती देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Mircrosoft

Microsoft Voluntary Exit Package news update : मायक्रोसॉफ्टने (Mircosoft) खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरील खर्च वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेतलायं. भारत, कॅनडा, अमेरिका, ब्रिटनमधील पात्र कर्मचाऱ्यांना ऐच्छिक सेवानिवृत्ती घेण्याची ऑफर दिली आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली असून मायक्रोसॉफ्टच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावरील एकूण मनुष्यबळाच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त म्हणजे 60 हजार कर्मचारी सेवानिवृत्ती घेऊ शकतात.

फॉर्म 6 मध्ये बदल नाही; SIR संदर्भातील तिन्ही आदेश सर्वसंमतीनेच; निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

हा मर्यादित कालावधीचा बायआऊट कार्यक्रम चारही देशांच्या सहभागी टीम्समधील लेव्हल 70 आणि त्याखालील पात्र कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. या घोषणेनंतर काही तासांतच कर्मचाऱ्यांना ऑफरचे तपशील मिळणार आहेत. आता कंपनीच्या पाठिंब्यासह स्वच्छेने नोकरी सोडता येणार आहे. या कार्यक्रमात AI एक्सपीरियन्स, कोपायलट, फायनान्स, ह्युमन रिसोर्सेस, एक्सबॉक्स आणि विंडोज + डिवाइसेस यांसह अनेक विभागांमधील पात्र कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. मात्र, मार्केटिंग, कमर्शियल बिझनेस आणि सिक्युरिटी टीम्सना यातून वगळण्यात आलं आहे.

कॅनडा, भारत, ब्रिटन आणि अमेरिकेतील सहभागी टीम्समधील ‘लेव्हल ७०’ आणि त्याखालील पात्र कर्मचाऱ्यांसाठी ही ऐच्छिक बायआउट योजना उपलब्ध असेल. कंपनीच्या चीफ पीपल ऑफिसर एमी कोलमन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेमोमध्ये या उपक्रमामागची भूमिका मांडली. कोलमन म्हणाल्या, “जे पात्र कर्मचारी कंपनीबाहेर आपले भविष्य पाहण्याचा विचार करत आहेत, त्यांना हा उपक्रम कंपनीच्या पाठिंब्यासह आताच बदल करण्याचा एक नवीन पर्याय देतो. तसंच, सहभागी संस्थांना बदलत्या गरजांनुसार त्यांचे मनुष्यबळ जुळवून घेण्याचा हा आणखी एक मार्ग प्रदान करतो, असं मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केलं आहे.

मायक्रोसॉफ्टच्या वार्षिक फायलिंगनुसार, ३० जून २०२६ पर्यंत कंपनीकडे जागतिक स्तरावर २,२३,००० पूर्णवेळ कर्मचारी होते. या वर्षाच्या सुरुवातीलाही कंपनीने ऐच्छिक बायआऊट कार्यक्रम राबवला होता. यावेळी अमेरिकेतली सुमारे ७ टक्के कर्मचारी समाविष्ट होते. जुलैमध्ये कंपनीने आपल्या एक्सबॉक्स गेमिंग व्यवसायाची पुनर्रचना करताना आणि पाच स्टुडिओ विकण्याची योजना आखताना, जागतिक मनुष्यबळाच्या सुमारे २.१ टक्के म्हणजेच ४ हजार ८०० नोकऱ्या कपात करण्याची घोषणा केली होती. गेमिंग विभागातील अनेक वर्षांच्या मोठ्या गुंतवणुकीनंतर त्यातून मिळणारा परतावा सुधारणे हा या बदलांचा उद्देश होता.

Election Commission : निवडणूक आयोगाचा ‘डॅमेज कंट्रोल’ सुरू; 5 वादग्रस्त निर्णय बदलले

दरम्यान, ही नवीन बायआउट ऑफर म्हणजे AI विकास आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मोठ्या प्रमाणावर संसाधने राखून ठेवत, आपल्या मनुष्यबळात आवश्यक सुधारणा करण्याच्या मायक्रोसॉफ्टच्या प्रयत्नांमधील पुढील पाऊल आहे.

follow us