३ मे रोजी परीक्षा, पण २७ एप्रिललाच खेळ झाला होता; वाघमारेकडून CBI च्या हाती लागला मोठा पुरावा?

NEET Paper Leak पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर मनीषा वाघमारे आता सीबीआय कोठडीत असून सीबीआयच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत.

  • Written By: Published:
३ मे रोजी परीक्षा, पण २७ एप्रिललाच खेळ झाला होता; वाघमारेकडून CBI च्या हाती लागला मोठा पुरावा?

NEET Paper Leak Manisha Got Paper 6 days Before Exam : नीट पेपर फुटीप्रकरणाता सीबीआयच्या तपासातून एक असा धक्कादायक गौप्यस्फोट झाला आहे, ज्यामुळे संपूर्ण देशाची झोप उडाली आहे. या महाघोटाळ्यात अटक करण्या आलेल्या मनिषा वाघमारे हिच्याकडे परीक्षेच्या तब्बल 6 दिवस आधी, म्हणजेच 27 एप्रिल रोजीच प्रश्नपत्रिका पोहोचल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आल्याचे सांगितले जात आहे.

15 हजार डॉक्टर घडवल्याचा दावा, पण आता स्वतःच आरोपीच्या पिंजऱ्यात; कोण आहेत मोटेगावकर?

त्या 6 दिवसांत काय घडलं?

27 एप्रिल 2026 रोजी मनिषा वाघमारेने शासकीय यंत्रणेत असलेल्या आपल्या गुप्त ‘हँडलर्स’च्या मदतीने प्रश्नपत्रिका हस्तगत केली. त्यानंतर एक असा ‘अंडरग्राउंड’ खेळ सुरू झाला, ज्याचा सुगावा ना पोलिसांना लागला ना यंत्रणेला. मनिषाने अत्यंत गोपनीयतेने तिचा विश्वासू साथीदार धनंजय लोखंडे याला या कटात ओढले. त्यानंतर लोखंडेच्या माध्यमातून नाशिकमध्ये समुपदेशनाचा व्यवसाय करणाऱ्या शुभम खैरनारशी संपर्क करण्यात आला. खैरनारकडे असलेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्काचा वापर करून या पेपरचा सौदा मोठ्या रकमेच्या मोबदल्यात करण्यात आला.

पुरावा नष्ट करण्याची धडपड

मनिषा वाघमारेला माहित होते की, हा गुन्हा छोटा नाही. म्हणूनच, 3 मे रोजी परीक्षा संपताच तिने पुराव्यांची होळी करण्यास सुरुवात केली. व्हॉट्सॲप चॅट्स, प्रश्नपत्रिकेच्या फोटोकॉपी आणि डिजिटल ट्रॅक्स मिटवण्यासाठी तिने जंगजंग पछाडले. 13 मे रोजी जेव्हा पुणे पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला, तेव्हा सलग 18 तास चाललेल्या झाडाझडतीमध्ये पोलिसांना या कटाची भीषणता जाणवली. मनिषाने पुरावे नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण सीबीआयच्या हाती अशा काही डायऱ्या आणि डिजिटल धागेदोरे लागले आहेत, ज्यांनी या ‘6 दिवसांच्या मिस्ट्री’चा पर्दाफाश केला.

NEET Paper Leak : एका ‘खोडकर’ विद्यार्थ्याने असा फोडला कुलकर्णीचा सेट केलेला ‘मास्टर’ प्लॅन!

एम सर आणि मनिषा वाघमारे यांचे कनेक्शन काय?

वाघमारे सध्या सीबीआयच्या कोठडीत असून ती तपासात पूर्णपणे सहकार्य करत नसल्याचा गंभीर आरोप सीबीआयने केला आहे. तिने हा पेपर नेमक्या किती विद्यार्थ्यांना पुरवला आणि त्या बदल्यात किती कोटींची उलाढाल झाली, याची नावे सांगण्यास ती टाळाटाळ करत आहे. याच मनीषा वाघमारेच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी’ क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांनाही सीबीआयने अटक केली आहे. लातूरच्या ‘एम सरांचे’ या 6 दिवसांच्या कालावधीत नेमके काय कनेक्शन होते, हे शोधण्याचे मोठे आव्हान आता सीबीआयसमोर आहे. वाघमारेने ज्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने 27 एप्रिललाच पेपर चोरला, तो यंत्रणेतील ‘विभीषण’ कोण? आणि या 6 दिवसांच्या कालावधीत ‘एम’ सरांच्या माध्यमातून हा पेपर आणखी किती विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अंधार कालवण्यासाठी वापरला गेला? हे तपासून समोर येईल.

follow us