NSE च्या IPO साठी मार्ग मोकळा; SEBI च्या मंजुरीनंतर बाजारात होणार मोठा धमाका
NSE IPO : भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी संस्था NSE लवकरच मोठा धमाका करण्याची शक्यता आहे. कंपनीचा बहुप्रतिक्षित आयपीओ पुढील 7-8 महिन्यांत
NSE IPO : भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी संस्था NSE लवकरच मोठा धमाका करण्याची शक्यता आहे. कंपनीचा बहुप्रतिक्षित आयपीओ पुढील 7-8 महिन्यांत येण्याची शक्यता आहे. कंपनीने यासाठी तयारी देखील सुरु केली असल्याची माहिती समोर येत आहे. कंपनीचा हा आयपीओ 2016 मध्ये येणार होता मात्र सेबीसोबत असणाऱ्या वादामुळे तेव्हा आयपीओ भारतीय शेअर बाजारात लॉन्च झाला नव्हता. आता सेबीसोबत असणारा वाद जवळपास संपल्याने कंपनीने पुन्हा एकदा आयपीओवर काम करत असल्याची चर्चा जोराने सुरु झाली आहे.
काही अहवालानुसार, सेबीने नियुक्त केलेल्या एका तज्ज्ञ समितीने, NSE ने सुमारे 1800 कोटींची रक्कम भरून आपल्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या खटल्यांची तडजोड करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सेबीच्या या निर्णयानंतर अनेक वर्षांपासून रखडलेला आयपीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यापूर्वीही, अशाच एका प्रकरणाची तडजोड करण्यासाठी NSE ने 643 कोटींची रक्कम भरली होती. त्याद्वारे त्यांनी आपल्या जुन्या समस्यांचे निराकरण करून पुढे वाटचाल करण्याचा आपला इरादा स्पष्ट केला होता.
को-लोकेशन’ आणि ‘डार्क फायबर’शी संबंधित खटले
कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश जय नारायण पटेल यांच्या अध्यक्षतेखालील, तडजोड आदेशांवर काम करणाऱ्या चार सदस्यीय तज्ज्ञ समितीकडून NSE ला ही मंजुरी मिळाली आहे. या समितीने NSE च्या ‘को-लोकेशन’ आणि ‘डार्क फायबर’ प्रकरणांशी संबंधित अर्जांना मंजुरी दिली आहे. ज्यामध्ये ‘को-लोकेशन’ मुद्द्यासाठी 1,165 कोटी रुपये आणि ‘डार्क फायबर’ मुद्द्यासाठी 223 कोटी रुपये भरण्याचा प्रस्ताव समाविष्ट होता.
पुढील टप्प्यात, अंतिम मंजुरीसाठी या शिफारसी सेबीच्या ‘पूर्णवेळ सदस्यां’समोर (Whole-Time Members) सादर केल्या जातील. जर या शिफारसींना मंजुरी मिळाली, तर त्यामुळे NSE ला आपल्या IPO च्या योजना पुन्हा कार्यान्वित करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल.
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक-
NSE ने आपला IPO प्रस्ताव सर्वप्रथम 18 ऑक्टोबर 2016 रोजी दाखल केला होता. मात्र, ‘को-लोकेशन’ वाद, प्रशासनाशी संबंधित (governance) मुद्दे आणि तांत्रिक अनियमितता या कारणांमुळे SEBI ने याला मंजुरी देणे थांबवले होते. गुंतवणूकदार गेल्या जवळपास एका दशकापासून या IPO ची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक अपेक्षित IPO पैकी हा एक मानला जातो.