Online Gaming खेळणं पडू शकतं महागात… १ एप्रिलपासून लागू होणार ‘हा’ नियम!

Online Gaming खेळणं पडू शकतं महागात… १ एप्रिलपासून लागू होणार ‘हा’ नियम!

नवी दिल्ली : ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ऑनलाइन गेम खेळणं त्यांना महागात पडू शकतं. कारण, येत्या १ एप्रिल २०२३ पासून गेमिंग अप्लिकेशन वर टॅक्स (कर) लावण्यात येणार आहे. त्यामुळे ऑनलाइन गेम खेळणं आता महागात पडणार आहे.

ऑनलाइन गेमिंग अप्लिकेशनवर टॅक्स डिटेक्टेड ऍट सोर्स आता टीडीएस दर बदल करण्यात आला आहे. येत्या १ एप्रिलपासून नवा नियम लागू करण्यात येणार आहे. यापूर्वी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) आणि पंतप्रधान कार्यालयाने यावर वस्तू आणि सेवा कर प्रस्तावाला ऑनलाइन गेमिंग इंडस्ट्रीने विरोध दर्शविला होता. मात्र, आता नवा नियम लागू होणार आहे. परंतु, त्याचा फटका मात्र ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांना बसणार आहे.

माझ्यावरील आरोपाचे कोणतेही पुरावे नाही, अनिल देशमुखांची विधानसभेत माहिती – Letsupp

यापूर्वी म्हणजे २३ फेब्रुवारी २०२३ रोजी ऑनलाइन गेमिंगशी संबंधित ई-गेमिंग, ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन आणि फेडरेशन ऑफ इंडियन फँटसी स्पोर्ट्स या तीन संस्थांनी केंद्र सरकारला या नव्या नियमातील बदलाबाबत फेरविचार करण्याची विनंती केली होती.

तर, त्यापूर्वी ९ फेब्रुवारी २०२३ रोजी पंतप्रधान कार्यालयाला एक पत्र पाठवले होते. त्यात या तीन संस्थांनी ऑनलाइन गेमिंगचे गॅम्बलिंग, होर्स रेसिंग तसेच कसिनो याला जोडण्याची विनंती या पत्रातून करण्यात आली होती. या इंडस्ट्रीवर तब्बल २८ टक्के जीएसटी लावला जातो. त्यामुळे ऑनलाइन गेमिंग कंपन्याना प्रत्येक व्यवहारावर १० हजार रुपयांपेक्षा जास्त बक्षीस जिंकणाऱ्याना ३० टक्के टीडीएस द्यावा लागत आहे. तो १ एप्रिलपासून द्यावा लागणार आहेच. तसेच आता ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांनाही वार्षिक उत्पन्नावर हा नियम लागू करण्यात आला आहे.

(220) Rahul Gandhi : राहुल गांधींची खासदारकी रद्द, विरोधक बरसले | LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube