अधिकृत कागदपत्रे, महायुद्ध ते आधुनिकपणा…पासपोर्टच्या ‘प्रवासा’ची भन्नाट कहाणी
Passport: पासपोर्ट हा अनेकदा केवळ ओळखीचा पुरावा म्हणून पाहिला जातो, पण त्याचा इतिहास खूप मोठी कहाणी सांगतो.
Passport Journey and The Digital Revolution: साध्या प्रवास परवान्यापासून सीमापार जाण्याच्या जगातील सर्वात प्रभावी दस्तएेवज पासपोर्ट झाला आहे. पासपोर्ट हा अनेकदा केवळ ओळखीचा पुरावा म्हणून पाहिला जातो, पण त्याचा इतिहास खूप मोठी कहाणी सांगतो.
केवळ प्रवासाचे दस्तऐवज नाही
शतकानु शतके आधुनिक राष्ट्र-राज्यांच्या विकासाबरोबर पासपोर्टची संकल्पना विकसित झाली.
आपल्या सीमेत कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला बाहेर जाऊ द्यायचे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पासपोर्ट
त्यामुळे पूर्वी खासगी करारांद्वारे होणारा प्रवास हळूहळू सरकारी नियमांत गेला
सीमापार लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पासपोर्ट हे महत्त्वाचे साधन
———————————
आधुनिक पासपोर्टपूर्वी जगात काय होते ?
प्रवासासाठीची अधिकृत कागदपत्रे आधुनिक पासपोर्टच्या खूप आधीपासून अस्तित्वात
यातील सर्वात जुना उल्लेख बुक ऑफ नेहेमायाहमध्ये आढळतो.
यात पर्शियाचा राजा आर्टॅक्सर्क्सिस याने सुरक्षित प्रवासासाठी अधिकृत पत्रे दिल्याचा उल्लेख
मध्ययुगीन युरोपमध्ये व्यापारी आणि प्रवाशांना राजे सेफ-कंडक्ट पत्रे देत असत.
या पत्रांमध्ये प्रवाशाची ओळख आणि प्रवासाचा उद्देश नमूद केलेला असे.
16व्या शतकापर्यंत युरोपातील सीमा अधिक स्पष्ट झाला.
त्यामुळे प्रवास कागदपत्रे सर्वसामान्य झाली.
————————————
सरकारांनी प्रवासावर नियंत्रण कसे मिळविले ?
सरकारे अधिक शक्तिशाली होत गेली तसतसे त्यांनी प्रवासावरही अधिक नियंत्रण आणले
1799 मध्ये पीटर द ग्रेटकडून रशियातील एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणाऱ्यांसाठी अधिकृत परवाने
फ्रान्समध्ये लुई चौदावा यांनी अनेक नागरिकांना सरकारी परवानगीशिवाय देश सोडण्यास बंदी घातली
यामुळे प्रवास हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय न राहता सरकारच्या नियंत्रणाखाली आला
————————————————-
खुल्या सीमांपासून कडक निर्बंधांपर्यंत
19व्या शतकाच्या सुरुवातीला काही काळ प्रवास अधिक मुक्त झाला
1815 मध्ये नेपोलियनच्या पराभवानंतर व्यापार, रेल्वे आणि उदारमतवादी विचारसरणीमुळे प्रवास अधिक सुलभ
1800 च्या उत्तरार्धात पश्चिम युरोपातील अनेक भागांत पासपोर्ट बाळगणे ऐच्छिक झाले
1861 मध्ये फ्रान्सने देशांतर्गत प्रवासासाठी पासपोर्टची सक्ती रद्द केली
ब्रिटनने आंतरराष्ट्रीय स्तरावर पासपोर्टविरहित प्रवासाला जोरदार पाठिंबा दिला
पहिल्या महायुद्धामुळे पासपोर्ट कसा बदलला ?
पहिल्या महायुद्धामुळे पासपोर्ट हा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी अत्यावश्यक दस्तऐवज बनला
सुरक्षा, स्थलांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक देशांकडून पुन्हा कडक पासपोर्ट नियम
युद्धानंतर लीग ऑफ नेशन्सकडून 1920, 1926 मध्ये परिषदांचे आयोजन
पासपोर्टचे आंतरराष्ट्रीय मानकीकरण केले
छोट्या पुस्तिकेचा आकार, पासपोर्ट फोटो यांचा समावेश करण्यात आला
————————————
नागरिकत्व नसलेल्यांसाठीचा पासपोर्ट-आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास झपाट्याने वाढला
सर्व देशांमध्ये एकसमान मानके असलेला पासपोर्ट आवश्यक ठरला
1980 मध्ये आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेकडून मशीन-रीडेबल पासपोर्टसाठी जागतिक मानके निश्चित
त्यामुळे इलेक्ट्रॉनिक पडताळणी शक्य झाली
याच पायावर पुढे बायोमेट्रिक पासपोर्ट विकसित झाले
1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि २००० च्या दशकाच्या सुरुवातीला मायक्रोचिप पासपोर्ट सुरू
या चिपमध्ये प्रवाशाची वैयक्तिक माहिती आणि बायोमेट्रिक माहिती सुरक्षितपणे साठवली जाऊ लागली