धक्कादायक..! 50 पैकी तब्बल 39 प्रदूषित शहरे भारताची; अहवालाने दिला धोक्याचा इशारा

धक्कादायक..! 50 पैकी तब्बल 39 प्रदूषित शहरे भारताची; अहवालाने दिला धोक्याचा इशारा

Air Pollution :  जगभरातील प्रदूषणाबाबत (Air Pollution) एक धक्कादायक अहवाल आला आहे. या अहवालात मागील 2022 या वर्षात भारत (Air Pollution in India) हा जगातील आठव्या क्रमांकाचा प्रदुषित होता. भारतातील पीएम 2.5 ची पातळी 53.3 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटवर घसरली असली तरी अजूनही जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सुरक्षित मर्यादेपेक्षा दहा पट जास्त आहे.

स्विस फर्म IQAir ने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टमध्ये हे रँकिंग दिले आहे आणि रँकिंगचा आधार एम 2.5 च्या पातळीवर तयार करण्यात आला आहे. ज्याला शास्त्रज्ञ आणि आरोग्य तज्ञ मुख्य प्रदूषक मानतात आणि ते कायम ठेवतात सरकारी आणि गैरसरकारी मॉनिटर्ससह तीस हजारांपेक्षा जास्त ग्राउंड आधारित मॉनिटर्स मधून गोळा केलेला डेटा 131 देशांमधून काढला गेला आहे.

पाकिस्तानची बत्ती गुल! कराचीसह अनेक शहरं अंधारात; मोबाईल चार्जिंगसाठी नागरिकांची धावाधाव

सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतीय शहरे जास्त दिसतात. यावेळी या यादीत सर्वाधिक 7 हजार 300 पेक्षा जास्त शहरांची नोंद झाली आहे तर 2017 मध्ये मागील वेळी 2 हजार 200 पेक्षा कमी शहरांची यादी तयार करण्यात आली होती.

अहवालानुसार भारतातील वायु प्रदूषणाचा आर्थिक खर्च 150 अब्ज डॉलर आहे. भारतातील पीएम 2.5 च्या एकूण प्रदूषणांपैकी 20 ते 35 टक्के प्रदूषण वाहतूक क्षेत्रातून होते. याशिवाय प्रदूषणाच्या इतर श्रोतांमध्ये औद्योगिक युनिट्स, कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्प, बायोमास जाळणे यांचा समावेश होतो.

पाकिस्तानचे लाहोर आणि चीनचे होटन शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे आहेत त्यानंतर राजस्थानमधील भिवडी आणि दिल्ली तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. दिल्लीत पीएम 2.5 ची पातळी 92.6 मायक्रोग्रम आहे जी सुरक्षित मर्यादेपेक्षा जवळपास 20 पट जास्त आहे.

कोरोनाच्या उद्रेकानंतर तब्बल तीन वर्षांनी चीन पर्यटकांसाठी खुल्या करणार सीमा

जगातील टॉप 10 देशांपैकी सहा शहरे भारतात आहेत. टॉप 20 पैकी 14, टॉप 50 पैकी 39 आणि टॉप 100 प्रदूषित शहरांपैकी 10 शहरे भारतीय आहेत. 65 शहरे भारतातील आहेत. गेल्या वर्षी या यादीत भारतातील 61 शहरे होती. नवीन वर्गीकरणानंतर दिल्ली आणि नवी दिल्ली या दोन्ही शहरांचा आता टॉप टेन प्रदूषित शहरांमध्ये समावेश झाला आहे.

दिल्ली हे आतापर्यंत जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर होते. परंतु यंदाच्या अहवालात ग्रेटर दिल्ली आणि राजधानी नवी दिल्ली यांच्यात फरक करण्यात आला आहे. दोन्ही स्वतंत्र शहरे म्हणून पहिल्या 10 मध्ये वैशिष्ट्यकृत आहेत. परंतु, प्रदूषित राजधान्यांच्या यादीत नवी दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे आणि जगातील सर्वात प्रदूषित शहर चाड देशातील इंजामिना आहे.

दोन्ही शहरातील पीएम 2.5 प्रदूषणाच्या पातळीत केवळ 0.6 मायक्रोग्राम चा फरक आहे. इंजामिना शहराची लोकसंख्या दहा लाखांपेक्षा कमी आहे तर नवी दिल्लीची लोकसंख्या 40 दशलक्षांपेक्षा जास्त आहे हेही लक्षात घेण्यासारखे आहे. दिल्लीच्या शेजारच्या गुडगाव नोएडा, गाझियाबाद आणि फरीदाबाद या शहरांमध्ये प्रदूषण पातळी कमी झाली आहे.

मागील वर्षांमध्ये नोंदवलेल्या पीएम 2.5 पातळीच्या तुलनेत प्रदूषण कमी झाल्याचे दिसते. फरीदाबादमध्ये 34% आणि 21 टक्क्यांनी घट झाली आहे. दिल्लीची घट केवळ आठ टक्के आहे. दिल्लीच्या शेजारच्या शहरांमध्ये प्रदूषणाची वास्तविक पातळी सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. 2002 मध्ये गाजियाबादचे पीएम 2.5 पातळी 88 मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त आणि गुडगावचे 70 मायकोग्रॅम होते.

अशा जास्त पातळीच्या प्रदूषणाचा सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे. कारण, त्यांचे फुप्फुसे विकसित होत असतात. वृद्ध आणि आजारी विशेषतः दमा, कर्करोग आणि मधुमेह असलेल्या रुग्णांनाही प्रदूषण घातक ठरत आहे. दरम्यान इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत कोलकाता हे दिल्लीनंतर दुसरे सर्वात प्रदूषित शहर आहे. परंतु, दिल्लीच्या तुलनेत हा फरक खूप मोठा आहे.

तुलनेने चेन्नई अधिक स्वच्छ शहर आहे. प्रदूषण पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या सुरक्षित पातळीच्या केवळ पाचपट आहे. 2017 पासून प्रदूषणाच्या सरासरी पातळीत वाढ नोंदवलेल्या मेट्रो शहरांमध्ये हैदराबाद आणि बंगळुरूचा समावेश आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 72 शहरे दक्षिण आशियातील आहेत जरी जवळपास सर्व शहरे भारतात आहेत. दहा सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीत पाकिस्तान आणि बांगलादेश आपल्यापेक्षा वर आहेत पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे वायू प्रदूषण ही या देशांची सामान्य समस्या आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube