इन्स्टाग्रामवर अधिक सक्रिय व्हा; सरकारी योजनांचा प्रचार वाढवा; पंतप्रधान मोदींचा मंत्र्यांना सल्ला

तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी इन्स्टाग्राम हे सध्या सर्वाधिक प्रभावी व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केल्याची माहिती आहे.

Modiiiii

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या शेवटी (PM) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांना सोशल मीडियाचा अधिक प्रभावीपणे वापर करण्याचे आवाहन केलं आहे. विशेषतः केवळ ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या माध्यमापुरते मर्यादित न राहता इन्स्टाग्रामवर अधिक सक्रिय होण्याचा आणि सरकारी योजनांची माहिती व्यापक प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचवण्याचा सल्ला त्यांनी दिल्याचं सांगितलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी मंत्र्यांना इन्स्टाग्रामवरील आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्यास, फॉलोअर्स वाढवण्यास आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांबाबत नियमितपणे माहिती, व्हिडिओ आणि जनजागृतीपर पोस्ट शेअर करण्याचे निर्देश दिले. तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी इन्स्टाग्राम हे सध्या सर्वाधिक प्रभावी व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केल्याची माहिती आहे.

मित्रों नव्हे, तर फ्रेंड्स, पोर्ट्रेट अँगल अन् सेल्फी कॅमेरा; PM मोदी 3 मिनिटांत खरचं Gen Z चे फेव्हरेट झाले?

बैठकीत बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, देशातील मोठ्या संख्येने तरुण इन्स्टाग्रामवर सक्रिय आहेत. त्यामुळे सरकारी योजना, उपक्रम आणि जनहिताचे निर्णय या माध्यमातून अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचू शकतात. यामुळे सरकार आणि नागरिकांमधील संवाद अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असंही त्यांनी अधोरेखित केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी याच संदर्भात स्वतःचे उदाहरणही दिले. काल रात्री त्यांनी प्रसिद्ध केलेला व्हिडिओ संदेश हा इन्स्टाग्रामवरील लोकप्रिय ‘शॉर्ट व्हिडिओ’ शैली लक्षात घेऊन तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती आहे. बदलत्या डिजिटल माध्यमांशी सुसंगत राहून नागरिकांशी, विशेषतः तरुणांशी थेट संवाद साधण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

follow us