Rahul Gandhi : खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी काय बोलणार? थोड्याच वेळात पत्रकार परिषद
सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुिनावली होती. त्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. संसदेच्या नियमानुसार शिक्षापात्र खासदाराला आपले पद गमवावे लागते. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने त्यासाठीची अधिसूचना काल दुपारी जाहीर केली. त्यानंतर देशभरात काँगेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली. याच मुद्दयांवर आज राहुल गांधी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी आज काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया
लोकसभा सदस्यत्व निलंबित केल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे. कोणतीही किंमत चुकवायला तयार आहे.”
मैं भारत की आवाज़ के लिए लड़ रहा हूं।
मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 24, 2023
सत्य बोलण्याचे परिणाम
राहुल गांधी सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयांवर खरं बोलले, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. राहुल गांधी नेहमी वस्तुस्थिती मांडत आले. नोटाबंदी असो, चीनसोबतच वाद असो किंवा जीएसटी असो. त्यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी सरकार हे सर्व करत आहे. अशी टीका आज काँग्रेसकडून आज करण्यात आली आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, कलम १०३ अंतर्गत सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रपतींनी घ्यायला हवा होता. तिथेही राष्ट्रपती आधी निवडणूक आयोगाकडून सूचना मागवतात, त्यानंतर निर्णय घेतला जातो. मात्र या प्रकरणात ही प्रक्रिया पाळली गेली नाही.
दरम्यान शिक्षेला स्थगिती मिळेल, असा विश्वासही अभिषेक मनू सिंघवी यांनी व्यक्त केला असून तसे झाल्यावर सदस्यत्व रद्द करण्यात आलेली बाजू आपोआपच संपुष्टात येईल.