महागाई मानव! पेट्रोल अन् डिझेलचे दर वाढताच राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका

राहुल गांधींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींचा 'महागाई मानव' असा उल्लेख केला असून केंद्र सरकारने जनतेच्या खिशावर हळूहळू वार केल्याचा त्यांनी आरोप केला.

News Photo   2026 05 25T212436.488

इंधनाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक (Economy) गणित पुन्हा विस्कळीत झाले. पेट्रोल आणि डिझेल महागल्याने वाहतूक खर्च वाढत असून त्याचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर होत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार टीका केली. निवडणुकांमध्ये आश्वासने द्यायची आणि उर्वरित काळात जनतेच्या खिशावर वार करायचा, हेच मोदी सरकारचे काम आहे, असा त्यांनी आरोप केला आहे.

राहुल गांधींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींचा ‘महागाई मानव’ असा उल्लेख केला असून केंद्र सरकारने जनतेच्या खिशावर हळूहळू वार केल्याचा त्यांनी आरोप केला. ते म्हणाले की, “केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर टप्प्याटप्प्याने वाढवले जात आहेत, जेणेकरून सामान्य नागरिकांच्या लगेच लक्षात येऊ नये. आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून देशात आर्थिक संकट येण्याचा इशारा दिला होता. मात्र, पंतप्रधान मोदी निवडणुकांमध्ये व्यस्त होते. निवडणुका संपताच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८ रुपयांनी वाढ करण्यात आली.

10 दिवसांत चौथ्यांदा इंधन दरवाढ, पेट्रोल 113 पार; सर्वसामान्यांना महागाईचा आणखी मोठा झटका

निवडणुकांमध्ये आश्वासने द्यायची आणि उर्वरित काळात जनतेच्या खिशावर वार करायचा, हेच मोदी सरकारचे काम आहे,” अशी टीका त्यांनी केली. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनधारक, शेतकरी तसेच वाहतूक व्यवसायावर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, इंधन दरवाढीचा परिणाम आगामी काळात महागाई वाढण्यातही होऊ शकतो.

इंधनाच्या दरात पुन्हा वाढ

शहर पेट्रोल दरवाढ पेट्रोल नवीन दर (प्रति लिटर) डिझेल दरवाढ डिझेल नवीन दर (प्रति लिटर)
Delhi ₹२.६१ ₹१०२.१२ ₹२.७१ ₹९५.२०
Kolkata ₹२.८६ ₹११३.४७ ₹२.८० ₹९९.८२
Mumbai ₹२.७६ ₹१११.२१ ₹२.८१ ₹९७.८३
Chennai ₹२.४६ ₹१०७.७७ ₹२.५७ ₹९९.५५

Tags

follow us