पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात नवभारताचा उदय; ‘राष्ट्रनिर्माणाची तपपूर्ती’ अंकाचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकाशन

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मोदीजींनी गेल्या १२ वर्षांत विविध क्षेत्रांत केलेले काम एका पुस्तकात किंवा एका भाषणात मांडणे कठीण आहे.

News Photo   2026 05 25T202159.317

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या (Petrol) १२ वर्षांत देशात सर्वांगीण परिवर्तन घडले असून नवभारताचा उदय झाला आहे. या नव्या भारतात गरीब, शेतकरी, युवा आणि महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाचा विचार करण्यात आला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला १२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजप प्रदेशाध्यक्षांच्या पुढाकारातून आयोजित ‘राष्ट्रनिर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा , भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण , मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम , आमदार निरंजन डावखरे आणि योगेश सागर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मोदीजींनी गेल्या १२ वर्षांत विविध क्षेत्रांत केलेले काम एका पुस्तकात किंवा एका भाषणात मांडणे कठीण आहे. ‘मै नरेंद्र दामोदरदास मोदी…’ हा शपथविधीतील आवाज आजही जनतेच्या स्मरणात आहे. या काळात देशाचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान जागृत झाला. आज भारत आत्मनिर्भरतेच्या दिशेने जगासमोर अभिमानाने उभा आहे.

10 दिवसांत चौथ्यांदा इंधन दरवाढ, पेट्रोल 113 पार; सर्वसामान्यांना महागाईचा आणखी मोठा झटका

ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारने गरीब केंद्रित विकासाचा अजेंडा राबवला. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार गेल्या दहा वर्षांत भारतातील २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. “२०१३-१४ मध्ये देशाचा जीडीपी १०३ लाख कोटी रुपयांवर होता. तो आता ३५७ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्राचाही जीडीपी १३ लाख कोटींवरून ५४ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे,” असे त्यांनी सांगितले.

पायाभूत सुविधांमध्ये मोठे बदल घडवून आणताना केंद्र सरकारने सागरमाला आणि भारतमाला प्रकल्पांच्या माध्यमातून रस्ते, बंदरे, विमानतळ आणि रेल्वेचे जाळे विस्तारले, असेही फडणवीस यांनी नमूद केले. “विकसित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी देशात गुणात्मक आणि संख्यात्मक बदल घडवले जात आहेत,” असे ते म्हणाले.

वाढवण बंदर प्रकल्पाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, “१९९२ पासून रखडलेली फाईल पुन्हा सुरू करून अडचणी दूर करण्यात आल्या. वाढवण बंदर भविष्यात जगातील पहिल्या दहा प्रमुख बंदरांमध्ये स्थान मिळवेल. तसंच, जीएसटी आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून भारताने मोठी झेप घेतल्याचे सांगत त्यांनी यूपीआय, परकीय गुंतवणूक, संरक्षण क्षेत्र, निर्यातक्षमता आणि आत्मनिर्भर भारत अभियानाचाही उल्लेख केला. “भारत आता जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल,” असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

follow us