राहुल गांधींचा पुन्हा एल्गार; जंतरमंतरवर आंदोलनाची घोषणा, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावरुन आरपारच्या लढाईचा इशारा

INDIA Alliance Protest : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन राहुल गांधींसह इंडिया आघाडी पुन्हा आक्रमक झाली आहे.

News Photo   2026 10 07T163911.646

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (ECI) यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन इंडिया आघाडीने पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांनी जंतरमंतरवर आंदोलनासाठी जाणार असल्याचं जाहीर करत सर्व इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना तिथे उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. काल आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आल्याचं सांगत आता जंतरमंतरवरच आंदोलन करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

6 ऑक्टोबरला राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांनी मोर्चा अडवत नेत्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आकाशवाणी भवन परिसरात ठिय्या देत आंदोलन सुरु ठेवलं होतं. या आंदोलनात इतर विरोधी पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते.

12 तासांत चार पत्रकार परिषदा अन् दोन मंत्र्यांचे गंभीर आरोप; राहुल गांधींना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने लावली ताकद

दरम्यान, विरोधी पक्षाच्या खासदारांची दिल्लीतील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय झाल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं. जवळपास तीन बसमधुन खासदार जंतरमंतरकडे रवाना होणार असुन तिथे आंदोलन करण्यात येणार आहे. आपल्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी त्याची पर्वा नसुन हे गुन्हे आपल्यासाठी पदकासारखे असल्याचं म्हणत राहुल गांधी यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे.

6 ऑक्टोबरच्या आंदोलनादरम्यान इंडिया आघाडीचे नेते आकाशवाणी भवन परिसरात तब्बल 8 ते 9 तास ठिय्या देऊन बसले होते. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देईपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका विरोधकांनी घेतली होती. त्यानंतर रात्री 9 नंतर पोलिसांनी आंदोलक नेत्यांना ताब्यात घेत तीन बसमधुन त्या परिसरातून हलवलं. आता त्याच आंदोलनाला पुढे नेत इंडिया आघाडीने जंतरमंतरवर पुन्हा ठिय्या देण्याचा निर्णय घेतला आहे.

Tags

follow us