Rahul Gandhi यांच्या लूकची सोशल मीडियावर तुफान चर्चा

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 01T105239.129

काँग्रेस पक्षाचे ( Congress ) नेते व माजी अध्यक्ष राहुल गांधी ( Rahul Gandhi ) हे सध्या युकेच्या ( UK ) दौऱ्यावर आहेत. केंब्रिज विद्यापीठामध्ये राहुल गांधी  व्याख्यान देणार आहेत. परंतु राहुल गांधींची चर्चा मात्र वेगळ्या कारणामुळे होते आहे. राहुल गांधींनी आपला लूक चेंज केला आहे. त्यांनी आपली दाढी  कमी केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या या लूकची सर्वत्र चर्चा होते आहे.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान आपली दाढी वाढवली होती. कन्याकुमारी ते काश्मिर अशी त्यांनी आपली भारत जोडो यात्रा काढली होती. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी 3570  किलोमीटर पर्यंतचा प्रवासा केला. या यात्रेमधील त्यांच्या पांढऱ्या टी-शर्टची देखील तेवढीच चर्चा झाली होती.

सध्या राहुल गांधींचा नवीन लूक सर्वत्र व्हायरल झाला आहे. या लूकमध्ये राहुल गांधी यांनी आपली दाढी ट्रीम केलेली दिसते आहे. तसेच त्यांनी आपली कटींग देखील केलेली आहे. सोशल मीडियावर यूजर्सनी या लूकवर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.

दरम्यान राहुल गांधी हे 7 दिवासांच्या यूके दौऱ्यावर आहेत. यावेळी ते ‘लर्निंग टू लिसन इन द 21 फर्स्ट सेंच्युरी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. राहुल गांधी हे केंब्रिज विद्यापीठाच्या बिझनेस स्कुलचे माजी विद्यार्थी आहेत. तसेच यावेळी ते ‘बिग डेटा अँड डेमोक्रसी’ व ‘इंडिया चायना रिलेशन्स’ या विषयावर देखील बोलणार आहेत.

राहुल गांधींनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी केंब्रिज विद्यापीठात जाऊन तिथे व्याख्यान देण्यास उत्सुक आहे. मी तिथल्या बिझनेस स्कुलच्या विद्यार्थ्यांना संबोधित करेन. यावेळी राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध आदी विषयांवर मी बोलणार आहे, असे ते म्हणाले.

(पक्षाने कारवाई आधीही विचारलं नाही अन् नंतरही नाही, सत्यजित तांबेंनी स्पष्ट सांगितलं)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube