Stock Market : Infosys च्या शेअर्समध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांना फटका

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 17T110911.430

Share Market :  आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण पहायला मिळाली आहे. सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीमध्ये देखील घसरण दिसून आली आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच दिग्गज आयटी कंपनी इंफोसिसच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली आहे.

चीकू अजून लहानच, कोहलीच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट

सोमवारी इंफोसिसचे शेअर्स 10 टक्क्यांनी घसरले आहेत. यानंतर इंफोसिसच्या एका शेअरचा भाव 1250.30 रुपयांवर आला आहे. हा शेअर सध्या 12 टक्क्यांनी घसरुन 1222 वर व्यवहार करत आहे. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास इंफोसिसच्या शेअरचा भाव 11.76 टक्क्यांच्या घसरणीसह 1226.15 रुपयांवर व्यवहार करत होता. आज सकाळी इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री दिसून आली. आज कंपनीचे 27 लाख शेअर्स विक्री झाले आहेत.

Maharashtra Bhushan Award ceremony : सभा संपताच ठाकरे व पवार रुग्णांच्या भेटीस थेट रुग्णालयात

इन्फोसिसच्या घसरणीमुळे इतर आयटी शेअर्समध्ये देखील घसरण दिसून आली आहे. LTI Mindtree 8.76 टक्के, Tech Mahindra 6.46 टक्के, L & T Technology 5.86 टक्के, Coforge 4.88 टक्के, TCS 3.42 टक्क्यांनी घसरले आहेत. आयटी इंडेक्स आणि शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube