ग्रामीण भागातील महिलांना दिलासा, उभारणार ‘SHE MART’

SHE MART : ग्रामीण भागातील महिलांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

  • Written By: Published:
SHE Mart

SHE MART : ग्रामीण भागातील महिलांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील महिलांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने SHE MART उभारण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं सांगितले जात आहे.

तर दुसरीकडे अर्थसंकल्प 2026 च्या भाषणात बोलताना मुंबई- पुणे हायस्पीड कॉरिडोर सुरु करणार असल्याची माहिती देखील निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. याच बरोबर कर्करोग आणि मधुमेहाची औषधे स्वस्त होणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे.

मुंबई- पुणे हायस्पीड कॉरिडोर सुरु करणार

मुंबई-पुणे हायस्पीड कॉरिडोर सुरु करणार असल्याची घोषणा देखील निर्मला सीतारमण यांच्याकडून करण्यात आली आहे. याचबरोबर 7 नवीन हायस्पीड रेल्वे सुरु करणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे.

मंदिरांसाठी 5000 कोटी रुपयांची तरतूद

तर दुसरीकडे मंदिरांसाठी 5000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची देखील माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. याचा फायदा टियर 2 आणि 3 मधील शहरांना होणार आहे.

उच्च शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतीगृहे; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

राज्यांसाठी 1.4 लाख कोटींची तरतूद

2026-27 च्या अर्थसंकल्पामध्ये राज्यांसाठी 1.4 लाख कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यानुसार राज्यांना आर्थिक स्वरुपाचे नियोजन करावे असं देखील निर्मला सीतारमण म्हणाल्या.

तर 1 एप्रिल 2026 पासून नवा आयकर कायदा लागू होणार असल्याची देखील माहिती निर्माला सीतारमण यांनी दिली आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देत अपघात विमा करमुक्त करणार असल्याची घोषणा देखील निर्मला सीतारमण यांनी केली आहे.

follow us