…तर भाजपला १०० जागांच्या आत रोखता येईल, नीतीश कुमारांनी सांगितला भाजपला रोखण्याचा प्लॅन

  • Written By: Published:
…तर भाजपला १०० जागांच्या आत रोखता येईल, नीतीश कुमारांनी सांगितला भाजपला रोखण्याचा प्लॅन

“विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली तर भाजपला १०० जागांच्या आत रोखता येईल” असा दावा बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार (Nitish Kumar) यांनी केला आहे. पण याचवेळी ते पुढे म्हणाले की ‘विरोधक एकत्र आले नाही तर पुन्हा एकदा भाजप सत्तेत येईल’

एकप्रकारे नीतीश कुमार यांनी काँग्रेससह विरोधीपक्षांना एकत्र येत आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचे पुन्हा आवाहनच केले आहे. आज नीतीश कुमार हे पाटण्यात आयोजित भाकपच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले

यावेळी आपल्या भाषणात नितीशकुमार म्हणाले की “२०२४ मध्ये सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली तर भाजपचा सुपडा साफ होईल. आज स्वातंत्र्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे सर्वच जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन वाटचाल करावी लागेल.”

हेही वाचा : उद्धवजी धनुष्यबाण जाऊ द्या… जगनमोहन रेड्डी कडे बघा आणि लढा!

काँग्रेसने पुढाकार घेतला पाहिजे

यावेळी नितीश कुमार यांनी काँग्रेसला पुढाकार घेण्यासाठी आवाहन केले. ते म्हणाले की “काँग्रेसने पुढाकार घेऊन आता विरोधकांची मोट बांधली पाहिजे. यासाठी उशीर करता कामा नये, विरोधपक्षांनी एकत्र येऊन ठरवले पाहिजे कोण कुणाच्या विरोधात निवडणूक लढवेल, कुणासोबत युती करायची.”

यावेळी ते म्हणाले की, “बिहारमध्ये विरोधक एकजूट होऊन काम करत आहेत. दिल्लीत सोनिया व राहुल गांधींची मी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सलमान खुर्शीद यांना सांगितले की आता तुमच्या माध्यमातून काँग्रेस नेतृत्वाला विरोधकांची एकजूट करण्याचे आवाहन करत आहे.”

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube