कोरोनानंतर आता देशात नव्या ‘फ्लू’, आयसीएमआरसह ‘आयएमए’च्या मार्गदर्शक सूचना
नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून नागरिकांना फ्लूसदृश्य आजाराची लक्षणांची साथ पसरली आहे. हा एक प्लूचाच प्रकार असून प्लूए चा उपप्रकार एच ‘एच३एन२’ या विषाणूमुळे होत आहे. यासंदर्भात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. देशभरातील नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, उलट्या, अंगदुखी या आजारांना सामोरं जावं लागत आहे. या लक्षणांची अनेक रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण वाढलंय. यासोबतच सतत खोकला आणि ताप येणं ही या आजाराची मुख्य लक्षणे असल्याचं समोर आलंय.
आमदार हसन मुश्रीफ यांची उच्च न्यायालयात धाव…#HasanMusrif #EDRaidhttps://t.co/zv1pg9z79H
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 5, 2023
प्लूसदृश्य आजाराची लक्षणे असलेल्या नागरिकांनी उपचार घेताना प्रतिजैवकांचा वापर करु नये, डॉक्टरांकडूनही सध्या फक्त लक्षणांवर औषधे देण्याचा सल्लाही आयएमएने दिला आहे. या आजारामध्ये साधारणपणे पाच ते सात दिवस ताप येत, तसेच खोकला तीन आठवड्यांपर्यंत राहणार असल्याचंही आयएमएने स्पष्ट केलं आहे.
‘तुम्हाला सीएम व्हायचं होतं तर पोराला मंत्री करायला नको होतं’; ठाकरेंना खासदाराने दिला घरचा आहेर
देशात प्लूसदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अधिक असून या विषाणूचा प्रसार हवेतून वाढत आहे. मुख्यत: 15 पेक्षा कमी आणि 50 पेक्षा अधिक वयाच्या रुग्णामध्ये प्लूसदृश्य आजाराची लक्षणे आढळून येत आहेत.
‘तुम्हाला सीएम व्हायचं होतं तर पोराला मंत्री करायला नको होतं’; ठाकरेंना खासदाराने दिला घरचा आहेर
श्वसननलिकेच्या वरील भागाला या विषाणूची लागण झाल्यानंतर ताप येत असल्याचा निष्कर्ष 15 डिसेंबरपासून करण्यात आलेल्या पाहणीवरुन काढण्यात आलाय.
दरम्यान, हा आजार जीवघेणा नसला तरीही काही रुग्णांच्या बाबतीत श्वसनयंत्रणेला संसर्ग होत असल्याने रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावं लागत असल्याचंही तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे.