काँग्रेस नेते Pawan Khera यांना 3 मार्चपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) काँग्रेसचे ( Congress ) नेते पवन खेडा ( Pawan Kheda ) यांना 3 मार्च पर्यंत अंतरिम जामीनसाठी सवलत दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 3 मार्च 2023 पर्यंत खेडा यांची सुनावणी टाळली आहे. न्यायालयाने खेडा यांच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी उत्तर प्रदेश व आसाम सरकार यांना वेळ दिला आहे.
या निर्णयामुळे पवन खेडा यांना 3 मार्च पर्यंत दिलासा मिळाला आहे. याआधीच्या सुनवाईमध्ये सर्वोच्च न्यायालयाने पवन खेडा यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालय हे उत्तर प्रदेश व आसाममध्ये नोंदवलेल्या 3 एफआयआर एकाच ठिकाणी नोदंवून घेण्याच्या विचार करत आहे.
(व्हीपच्या भांडणावर उदय सामंत स्पष्टच बोलले; म्हणाले, व्हीप फक्त.. – Letsupp)
दरम्यान पवन खेडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या वडिलांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात उत्तर प्रदेश व आसाममध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर आसाम पोलिसांनी पवन खेडा यांना रायपूरला जाण्याच्या विमानातून उतरवले होते व त्यांना अटक केली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्य़ा आदेशानंतर पवन खेडा यांना दिल्लीच्या एका न्यायालयाने गुरुवारी जामीन दिला होता.
पवन खेडा यांच्या अटकेनंतर काँग्रेसने विमानतळावरच आंदोलन सुरु केले होते. ही तानाशाही सुरु आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी देखील खेडा यांच्या या अटकेचा निषेध केला आहे. आमच्या महाधिवेशनापूर्वी छत्तीसगडच्या आमच्या नेत्यांना ईडीची नोटीस पाठवली जाते. आज आमच्या मीडियाच्या चेअरमन यांना विमानातू उतरवून अटक केली जाते. भारताच्या लोकशाहीला मोदी सरकारने हिटलरशाही बनवले आहे, असा आरोप खेडा यांनी केलाआहे.