विरोधी पक्ष विद्यार्थी आंदोलकांचा राजकीय शस्त्रांसारखा वापर करत आहे-राजनाथ सिंह
The opposition is using student protesters as a political weapon, देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Defence Minister Rajnath Singh says about cjp protest: दिल्लीतील जंतर-मंतरवरील(jantar mantar) विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर देशातले राजकीय वातावरण तापले. त्यानंतर विरोधी पक्षांनीही केंद्र सरकारला धारेवर धरले. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्ष नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी(Priyanka Gandhi) यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) दिल्लीतील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. त्यावर आता देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीत सुरु असलेले विद्यार्थी आंदोलन हा गंभीर चिंतेचा विषय आहे. पण या विद्यार्थी आंदोलनाच्या विद्यार्थ्यांच्या उपयोग विरोधी पक्ष एखाद्या राजकिय शस्त्रासारखा करत आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.
तसेच पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार विद्यार्थी आणि युवकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. मला विश्वास आहे की भारतातील युवक या सर्व प्रयत्नांना समजून घेतील आणि ते विकास व राष्ट्रनिर्माणाच्या मार्गाची निवड करतील. आम्ही हेही सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहोत की कोणावरही अन्याय होणार नाही, विशेषतः आमच्या युवक आणि विद्यार्थ्यांवर.पण विरोधकातील काही नेते लोकांमध्ये ‘कृत्रिम राग’ निर्माण करत आहेत. माझा विश्वास आहे की, विद्यार्थ्यांची दिशाभुल करण्याचा हा अपयशी प्रयत्न आहे. आम्ही युवकांबद्दल संवेदनशील आहोत. मानसून सत्र सुरू आहे आणि सरकारने सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याबाबत बोलले आहे. पण विरोधक संसदेत नाही तर रस्त्यावर उपाय शोधण्याचे अनुचित प्रयत्न करत आहेत. जर विरोधक गांभीर्याने घेत असतील तर त्यांनी सत्रात गोंधळ घालू नये, तर मुद्द्यांवर चर्चा करावी. असे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.