शरद पवारांसह देशातले बडे नेते उद्या कर्नाटकात कारण…

A resolution has been passed in the national executive of the party that Sharad Pawar is the national president of the NCP.

उद्या कर्नाटकात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदासाठी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह देशभरातील मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात बोलताना शरद पवारांनी उद्या कर्नाटकात सोहळ्याला हजेरी लावणार असल्याचं सांगितलं आहे. पवार यांनी आज पुण्यातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Karnataka Government : सिद्धरामय्यांच्या सरकारमध्ये कोण मंत्री होणार? हे पाच घटक ठरवतील

ते म्हणाले, उद्या कर्नाटकात होणाऱ्या शपथविधीला येण्याचं निमंत्रण मला काँग्रेस अध्यक्षांनी फोन करुन दिलं आहे. या सोहळ्याला देशातील अनेक मोठ्या नेत्यांना यासाठी निमंत्रण देण्यात आलं असून तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही देखील या सोहळ्याला हजेरी लावावी, असं काँग्रेस अध्यक्षांनी मला सांगितल्याचं पवारांनी स्पष्ट केलं आहे.

हवाई प्रवासाला झटका! परदेशवारी महागणार, मोदी सरकारने ‘या’ करात केली वाढ

काँग्रेसच्या अध्यक्षांनी निमंत्रण दिलं असल्याने उद्या मी कर्नाटकातील बंगळूरुमध्ये शपथविधी सोहळ्याला जाणार असल्याचं ते म्हणाले आहेत. नुकतीच कर्नाटकात निवडणुका पार पडल्या आहेत. कर्नाटकात निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेसने एकहाती विजय मिळवल्याची सध्या देशभरात सुरु आहे.

‘भाजपच्या सत्तेची चिमणीही लवकरच’… ‘त्या’ वक्तव्यावरून वडेट्टीवारांचा फडणवीसांना खोचक टोला

एकहाती विजय मिळाल्यानंतर कर्नाटकचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही ठरला आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर डी.के. शिवकुमार यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आलीय. कोणाला मुख्यमंत्री करायचं याबाबत काँग्रेसच्या हायकमांडकडून निर्णय घेण्यात आला आहे.

अखेर सिद्धरामय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली तर डीके शिवकुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर या दोन्ही नेत्यांनी राज्यपाल थांवरचंद गेहलोत यांची भेट घेऊन त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. उद्या दुपारी 12 : 30 वाजता हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube