Plane Crash : एकाच दिवशी भारतीय हवाई दलाच्या तीन विमानांचा अपघात, चौकशीचे आदेश

Plane Crash : एकाच दिवशी भारतीय हवाई दलाच्या तीन विमानांचा अपघात, चौकशीचे आदेश

भरतपूर : राजस्थान (Rajasthan) आणि मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) दोन मोठे विमान अपघात झाले आहेत. (Plane Crash) भारतीय वायुसेनेची दोन चार्टर्ड (Chartered Aircraft) विमानं मध्यप्रदेशच्या मुरैना येथे आणि एक चार्टर्ड विमान राजस्थानच्या भरतपूरमध्ये कोसळलंय.

राजस्थानच्या भरतपूरमध्ये वायुसेनेचं विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळलं. पिंगोरा रेल्वे स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली आहे. अपघातानंतर विमानाला आग लागली आणि विमानांचा चक्काचूर झालाय. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. यात दोन पायलट गंभीर जखमी झाले आहेत.

शनिवारी सकाळी तीन विमानांचे अपघात झाल्यानं एकच खळबळ उडाली. एकाच दिवशी तीन विमानांचा अपघात झाल्यानं हवाई दलानं कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडूनही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. राजनाथ सिंह (Rajnath singh)यांनी सीडीएस अनिल चौहान (CDS Amil Chauhan) आणि हवाई दलाचे प्रमुख व्ही. आर. चौधरी अपघाताची माहिती मागवलीय.

भारतीय हवाई दलानं सांगितलं की, ग्वाल्हेरजवळ आज सकाळी भारतीय वायुसेनेच्या दोन लढाऊ विमानांचा अपघात झाला. हे विमान नियमित ऑपरेशनल फ्लाइंग ट्रेनिंग मिशनवर होतं. यातील तीन पायलटपैकी एकाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताचं कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मध्य प्रदेशमधील मुरेनाजवळ दोन विमानांची समोरासमोर धडक झाली. तर राजस्थानच्या भरतपूर येथे हवाई दलाचं लढाऊ विमान कोसळलं. सुखोई आणि मिराज या विमानांची धडक होऊन दोन्ही विमानं खाली कोसळली. हवाई सरावादरम्यान ही दुर्घटना घडली. या दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर हवाई तळावरुन उड्डाण घेतलं होतं.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह (Shivrajsingh chauhan) चौहान यांनी ट्विटरवर स्थानिक प्रशासनाला मदत आणि बचाव कार्यात आयएएफला मदत करण्याचे निर्देश दिलेत. सीएम चौहान यांनी ट्विटरवर सांगितलं की, मी स्थानिक प्रशासनाला जलद बचाव आणि मदत कार्यात हवाई दलाला सहकार्य करण्याचे निर्देश दिलेत. विमानांचे पायलट सुरक्षित राहावेत अशी मी देवाला प्रार्थना करतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube