ट्रम्प यांचा मोदींना फोन, होर्मुज खुली करण्यावर चर्चा झाली? ट्रम्प यांचा मोठा खुलासा…

Trump calls Modi पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये नुकताच फोनवर संवाद

Pm Modi And Donald Trump

Trump calls Modi, discusses opening Hormuz? Trump’s big revelation : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये नुकताच फोनवर संवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी एएनआयशी बोलताना माहिती दिली.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

मोदी यांच्याशी ट्रम्प यांचा नुकताच फोनवर संवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी एएनआयशी बोलताना माहिती दिली. फोन कॉल बद्दल माहिती देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, माझा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चांगला संवाद झाला ते माझे चांगले मित्र आहेत ते भारतासाठी चांगलं नेतृत्व करत आहेत.

महिला आरक्षणाबाबत मोठी अपडेट! 2023 ची घटनादुरूस्ती लागू, कायदा मंत्रालयाकडून नोटीफिकेशन जारी

दरम्यान 14 एप्रिल रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या फोनवरील संवादाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली. त्यामध्ये मोदी म्हणाले होते की, मला माझे मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आला. यावेळी आम्ही आमच्यातील विविध क्षेत्रातील विपक्षीय करांचा आढावा घेतला. आम्ही आमची व्यापक जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच यावेळी पश्चिम आशियातील परिस्थितीवरही चर्चा केली आणि हार्मोन्सची सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवण्यावर देखील भर देण्यात आला.

होर्मुझची सामुद्रधुनी संपूर्ण जगासाठी खुली करतोय

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत एक मोठे विधान करत घोषणा केली आहे. केवळ ४८ तासात, अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझवरील नाकेबंदी संपल्याची घोषणा केली. एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले, “होर्मुझ आता सर्वांसाठी खुला आहे. मला ही घोषणा करताना आनंद होत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेने सोमवारी (दि. 13) होर्मुझवर नाकेबंदी जाहीर केली होती. 

follow us