Union Budget 2023 : पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी (infrastructure Sector) मोठी तरतूद केली आहे. ट्रान्सपोर्ट इन्फ्रा प्रोजेक्टवर (Transport Infra Project) 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. तसेच अर्बन इन्फ्रा फंडासाठी दरवर्षी 10000 कोटी दिले जातील असे निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
गटार साफ करण्याची प्रक्रिया पूर्णपणे मशीनवर आधारित असणार आहे तसेच मिशन कर्मयोगी नागरी सेवकांची कार्यक्षमता वाढविण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. 2024 च्या निवडणुकांपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे
● पर कॅपिटा इन्कम दुप्पट होतंय, 1.97 लाख
● भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या स्थानी पोहोचला आहे
● उद्योग धंद्यासाठी भारतात पोषक वातावरण
● डिजिटल पेमेंटमध्ये मोठी भरारी, युपीआयचा मोठा वाटा
● 11.7 कोटी स्वच्छ भारत अंतर्गत, 9 कोटी उज्ज्वला योजना, पीएम सुरक्षा आणि जीवन ज्योतीत 46 टक्के लोकं
● ईपीएफओचा आकडा देखील दुप्पट झाला
● सध्याची करंट ग्रोथ 7 टक्के
● इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटच्या आधारे मदत करण्यावर भर
● फ्री फूड स्कीम पुढील एका वर्षासाठी राबवली जाणार
● ग्रीन ग्रोथवर विकास, ग्रीन उद्योग, ग्रीन एनर्जीवर भर
● कार्बन कमी करण्यासाठी अनेक पर्याय उभे करण्याचा प्रयत्न
● वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न
● जम्मू काश्मीर आणि लद्दाखच्या विकासाला देखील चालना देण्याचा प्रयत्न
● शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत अनेक योजनांची उभारणी होतेय
● टुरिझमला चालना देण्याचा मिशन मोडमधून प्रयत्न
● पीपीपी अंतर्गत उद्योगांची उभारणी करत शेतकऱ्यांचा विकास करण्याचा प्रयत्न
● अॅग्रीकल्चर स्टार्टअपला चालना देण्याचा प्रयत्न
● हाॅर्टीकल्चरसाठी 2 हजार 200 कोटी रुपयांचा निधी
● पीएम मत्स्य संपदा योजनेत सब योजना, ज्यात छोट्या उद्योजकांना चालना देण्यात येईल
● सहकारासाठी नवं मंत्रालय केलं होतं
● शेतकरी क्रेडिट टार्गेट 20 लाख कोटींपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न
● आत्मनिर्भर क्लीन योजना राबवली जाणार
● 157 नर्सिंग काॅलेज उघडली जाणार