Budget 2023 : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प मांडणार

Budget 2023 : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प मांडणार

नवी दिल्ली : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) देशाचा अर्थसंकल्प (India Budget 2023) संसदेत (Parliaments) मांडणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतूदी आणि कोणत्या क्षेत्रांना काय मिळणार? याबद्दलचं चित्र आज दुपारपर्यंत स्पष्ट होणारंय.

आज केंद्र सरकारचा आगामी लोकसभा (Loksabha)निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणारंय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पटलावर मांडणार आहेत. केंद्र सरकारच्या काळातील हा नववा अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळं निवडणूक पूर्व अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या हाती काय लागणार? याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मंगळवार (दि.31) पासून सुरुवात झाली. सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यानंतर संसदेत देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.

देशाच्या कृषी क्षेत्रानं वार्षिक 4.6 टक्के वाढ नोंदवल्याचं आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आलंय. देशाच्या विकासात आणि अन्नसुरक्षेत कृषी आणि त्याच्याशी संबंधित घटकांनी मोठी जबाबदारी पार पाडल्याचंही आर्थिक पाहणी अहवालात (Economic Survey) नमूद करण्यात आलंय. मागील काही वर्षात भारत कृषी उत्पादनांचा प्रमुख निर्यातदार देश म्हणून नावारुपास आल्याचंही या अहवालात म्हटलंय.

वर्ष 2021-22 मध्ये निर्यात ही 50.2 अब्ज डॉलर इतक्या विक्रमी स्तरावर पोहचलीय. तर 2022-23 या वर्षात सेवा क्षेत्राची वाढ चांगली झाली असून सेवा क्षेत्रानं 8.4 टक्क्यांची वाढ नोंदवलीय. पुढील वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये सेवा क्षेत्रात 9.1 टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचं या अहवालात म्हटलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube