Video : ‘Delulu’, ‘FOMO’ म्हणत शिंदे-सुळे संसदेत बोलले पण, नेमका अर्थ काय?

Gen Z Language In Parliament पेपर लीक विधेयकावर ज्यावेळी संसदेत चर्चा सुरू होती त्यावेळी सर्वाधिक चर्चेत राहिलेला शब्द म्हणजे 'Delulu'....

  • Written By: Published:
Gen Z Language Reaches Parliament

Gen Z Language Reaches Parliament Know Meaning Of Clocked It, Delulu And Fomo : “Delulu”, “FOMO”, “Clocked It”, “M.I.A.”… हे शब्द तुम्ही आतापर्यंत सोशल मीडियावरील रील्स, मीम्स किंवा Gen Z तरुणांच्या बोलण्यात ऐकले असतील. पण सोशल मीडियावर वारंवार ऐकू येणारे हे शब्द जेव्हा संसदेत घुमले, तेव्हा सर्वत्र त्याची चर्चा होऊ लागली आहे. विशेष म्हणजे पेपर लीक विधेयकावरील चर्चेदरम्यान शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील त्यांच्या भाषणात ‘Delulu’ या शब्दाचा वापर केला. तर इतर अनेक खासदारांनी ‘FOMO’, ‘Clocked It’ आणि ‘M.I.A.’ यांसारख्या Gen Z स्लँग्सचा उल्लेख केला. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर Gen-Z ची भाषा संसदेच्या कामकाजात ऐकायला मिळाल्याने या शब्दांचा नेमका अर्थ काय? याची उत्सुकता सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित झाली आहे.

लाईक्स, कमेंट्स अन् व्ह्यूजवर ठरतो Gen Z चा हॅप्पीनेस?, नव्या संशोधनातून मोठा खुलासा

संसदेत कोणत्या खासदारांनी कोणते शब्द वापरले?

नुकतेच संसदेत पेपर लीक विधेयकावरील चर्चा झाली. यादरम्यान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी FOMO आणि M.I.A. या शब्दांचा उल्लेख केला. तर, भाजपच्या खासदार बांसुरी स्वराज यांनी Clocked It, तसेच तेजस्वी सूर्या आणि श्रीकांत शिंदे यांनी Delulu आणि FOMO हे शब्द वापरले. दुसरीकडे, काँग्रेसचे खासदार दीपेंद्र हुड्डा यांनी “वास्ते गुना हुइया” या सोशल मीडिया ट्रेंडचा उल्लेख केला. तर सुप्रिया सुळे यांनीही आपल्या भाषणात Delulu हा शब्द वापरत विरोधकांवर टीका केली. यानंतर सोशल मीडियापुरती मर्यादित असलेली Gen Z ची भाषा थेट संसदेत पोहोचल्याने या शब्दांची देशभर चर्चा सुरू झाली आहे.

‘Delulu’ म्हणजे काय?

पेपर लीक विधेयकावर ज्यावेळी संसदेत चर्चा सुरू होती त्यावेळी सर्वाधिक चर्चेत राहिलेला शब्द म्हणजे ‘Delulu’. हा शब्द Delusion (भ्रम) या इंग्रजी शब्दावरून तयार झाला आहे. याचा अर्थ वास्तवापेक्षा वेगळ्या कल्पनांमध्ये किंवा भ्रमात जगणारी व्यक्ती असा होतो. सोशल मीडियावर एखादी व्यक्ती अवास्तव अपेक्षा किंवा कल्पना करत असेल, तर तिच्यासाठी हा शब्द वापरला जातो.

‘FOMO’ म्हणजे काय?

चर्चेवेळी खासदारांनी ज्याप्रमाणे डेलूलू हा शब्द प्रयोग केला तसेच काही खासदारांनी फोमो या शब्दांचाही उच्चार केला. या शब्दाची फोड केल्यास तो Fear Of Missing Out म्हणजेच FOMO होतो. एखादी संधी, कार्यक्रम, ट्रेंड किंवा अनुभव आपल्याकडून निसटून जाईल, अशी सतत वाटणारी भीती म्हणजे FOMO असा या शब्दांचा अर्थ जेन झींच्या भाषेत वापरला जातो. सोशल मीडियामुळे हा शब्द तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला आहे.

रील्सपासून ‘रिअल रिटर्न’कडे! Gen-Z शेअर बाजाराचे नवे बॉस, 40% हिस्सा तरूणांकडे

‘Clocked It’ म्हणजे काय?

भाजपच्या खासदार बांसुरी स्वराज यांनी सभागृहातील चर्चेवेळी Clocked It असा उल्लेख केला. Clocked It म्हणजे एखादी गोष्ट, परिस्थिती किंवा व्यक्तीचा हेतू अचूक ओळखणे असा होतो. उदाहरणार्थ, एखाद्याचं खोटं किंवा हेतू लगेच लक्षात आला, तर “You clocked it” असा वापर केला जातो. याशिवाय M.I.A हा शब्द प्रयोग करण्यात आला. आता ‘M.I.A.’ म्हणजे काय? तर, M.I.A. म्हणजे Missing In Action होय. सामान्य वापरात याचा अर्थ एखादी व्यक्ती बराच काळ संपर्कात नसणे, अचानक गायब होणे किंवा एखाद्या कामात दिसून न येणे असा घेतला जातो.

‘वास्ते गुना हुइया’ म्हणजे काय?

दिल्लीतील आंदोलनावेळी सोशल मीडियावर ‘वास्ते गुना हुइया’ या शब्दांनी अक्षरक्षः धुमाकूळ घातला होता. हाच शब्द काँग्रेसचे खासदार दीपेंद्र हुड्डा यांनी सभागृहात चर्चेवेळी उच्चारला. “वास्ते गुना हुइया” हे सोशल मीडियावर व्हायरल झालेला मीम आणि ट्रेंडिंग फ्रेज आहे. या वाक्याचा कोणताही अधिकृत अर्थ नाही. मात्र, मजेशीर किंवा उपरोधिक संदर्भात रील्स, मीम्स आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

खाजवा डोकं! महिन्याकाठी मिळणाऱ्या पगाराला Salary नाव कसं पडलं?

सोशल मीडियाची भाषा संसदेत का पोहोचली?

आजची Gen Z पिढी संवादासाठी पारंपरिक भाषेपेक्षा सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या स्लँग्सचा अधिक वापर करते. तरुणांपर्यंत आपला संदेश त्यांच्या भाषेत पोहोचावा आणि त्यांच्याशी अधिक प्रभावी संवाद साधता यावा, यासाठी अनेक खासदारांनी सभागृहात या शब्दांचा वापर केल्याचे मानले जात आहे. पण, खासदारांच्या या कृतीनंतर ‘Delulu’, ‘FOMO’ किंवा ‘Clocked It’ हे शब्द आता केवळ इंस्टाग्राम, रील्स किंवा मीम्सपुरते मर्यादित राहिलेले नाही. तर, Gen Z ची भाषा आता थेट संसदेपर्यंत पोहोचल्याचे यावरून अधोरेखित होत असून, सार्वजनिक आणि राजकीय चर्चेचाही ती एक भाग बनू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

follow us