Thalapathy Vijay चा अखेरचा चित्रपट जन नायकन ‘या’ दिवशी होणार रिलीज

Thalapathy Vijay : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला असून या निवडणुकीत थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने बाजी मारत

Thalapathy Vijay

Thalapathy Vijay : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला असून या निवडणुकीत थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने बाजी मारत अनेकांना धक्का दिला आहे. या निकालानंतर विजय थलापती तमिळनाडूचे मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता त्यांचा शेवटचा चित्रपट जन नायकन देखील आता रिलीज होणार आहे. या चित्रपटाची रिलीज तारीख समोर आली आहे.

विजयने राजकारणात सक्रिय होण्यासाठी अभिनयातून निवृत्ती घेतली असून त्यांचा हा शेवटचा चित्रपट आता रिलीज होणार आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर थलापती विजय सध्या सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चांमध्ये आघाडीवर आहे. 2024 मध्ये, विजयने आपल्या ‘तामिळगा वेट्री कझगम’ (TVK) या राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली होती. 2026 च्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला मिळालेल्या विजयानंतर, राज्याचा पुढील मुख्यमंत्री बनण्याच्या शर्यतीत एक प्रमुख दावेदार म्हणून विजय समोर आले आहे.

तर दुसरीकडे विजय थलापतीचा शेवटचा चित्रपट, जन नायकन, अद्याप चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला नाही. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता समोर आलेल्या वृत्तांनुसार, हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. ‘TV9’ च्या वृत्तानुसार, विजय थलापतीचा जन नायकन हा चित्रपट 4 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. तरीही, प्रदर्शनाची संभाव्य तारीख अखेर समोर आल्यामुळे चाहते मात्र आनंदी झाले आहेत.

जानेवारीत प्रदर्शित होणार होता चित्रपट

विजय थलपतीचा हा चित्रपट सुरुवातीला 9 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला मंजुरी दिली नाही, ज्यामुळे त्याचे प्रदर्शन अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडले. निर्मात्यांनी हा विषय न्यायालयातही नेला होता तरीही, हा चित्रपट आतापर्यंत प्रदर्शित होऊ शकलेला नाही.

अभिनयातून निवृत्ती

या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतरच थलपती विजयने अभिनयातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. आता त्याला आपले उर्वरित आयुष्य जनसेवेसाठी समर्पित करायचे आहे. परिणामी, त्याने अभिनयातून बाजूला होण्याचा आणि एक राजकारणी म्हणून नवीन कारकीर्द सुरू करण्याचा निर्णय घेतला असं विजय थलापती म्हणाले आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर; कोणत्या पक्षाला किती जागा; जाणून घ्या सर्वकाही –

विजय थलापती यांचा जना नायकन हा चित्रपट तमिळसोबतच हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात थलपती विजयसह पूजा हेगडे आणि बॉबी देओल हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. आता, या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

follow us