PM मोदींनी अमेरिका दौऱ्यात कोणते करार केले? मोदी-बायडेन यांच्या मैत्रीचा देशाला काय फायदा होणार?

PM मोदींनी अमेरिका दौऱ्यात कोणते करार केले? मोदी-बायडेन यांच्या मैत्रीचा देशाला काय फायदा होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा अमेरिका दौरा दोन्ही देशांमधील संबंध हे आणखी चांगल्या प्रकारे प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे. तसेच भारतासाठी आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्याही हा दौरा विशेष आहे. पीएम मोदींच्या या दौऱ्यात अनेक मोठे करार (Agreement) करण्यात आले. यामध्ये रेल्वे, तंत्रज्ञान, ड्रोन, जेट इंजिन आणि स्पेस क्षेत्रासंदर्भात करार करण्यात आले. (What did India get from PM Modi’s visit to America?)

जेट इंजिनचे उत्पादन सुरू होणार

संरक्षण क्षेत्रात झालेल्या करारानंतर आता भारतात फायटर जेट इंजिनचे उत्पादन सुरू होणार आहे. सध्या भारत अमेरिका आणि रशियाकडून लढाऊ विमानांची जेट इंजिन खरेदी करत आहे. मात्र, या करारानंतर आता जेट इंजिनची निर्मिती भारतातच सुरू होणार आहे. या संरक्षण करारामध्ये, GE एरोस्पेसने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबत भारतीय हवाई दलाच्या (IAF) ‘LCA’ MK 2 तेजस हलक्या लढाऊ विमानांसाठी संयुक्तपणे लढाऊ जेट इंजिनांची निर्मिती करण्यासाठी करार केला आहे. या करारामध्ये GE एरोस्पेसच्या F 414 इंजिनांचे भारतात उत्पादन देखील समाविष्ट आहे. GE एरोस्पेस आवश्यक निर्यात अधिकार मिळविण्यासाठी यूएस सरकारसोबत काम करत आहे.

गड्या आपला गावच बरा! सुट्टीवर आलेले मुख्यमंत्री शिंदे पत्नीसह रमले शेत-शिवारात… 

ड्रोन खरेदीबाबतही करार
पीएम मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात झालेल्या चर्चेनंतर झालेल्या करारानंतर भारताकडून जनरल अॅटोमिक्सच्या MQ.9 रीपर सशस्त्र ड्रोनच्या खरेदीबाबतही मोठा करार झाला आहे. हे ड्रोन भारतात आल्यानंतर चिनी गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. रीपर ड्रोन हिंद महासागर आणि चीनच्या सीमेवर भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि पाळत ठेवण्याची क्षमता देखील मजबूत करतील. आधीच्या MQ1 प्रिडेटरच्या तुलनेत, यात नऊ पट अधिक शक्ती आहे. सुमारे 29 हजार कोटींच्या या डीलमुळे भारताला 30 कॉम्बॅट ड्रोन मिळणार आहेत.

गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक होणार
अमेरिकन कॉम्प्युटर चिप निर्माता कंपनी मायक्रोनने गुजरातमध्ये $2.7 अब्ज गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी गुजरातमध्ये असेंबलिंग आणि टेस्टिंग प्लांट उभारणार आहे. कंपनीचे सीईओ संजय मेहरोत्रा ​​यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला. सरकारच्या एटीएमपी योजनेंतर्गत हा प्लांट मंजूर झाला होता. या योजनेमध्ये असेंबलिंग, टेस्टिंग, मार्किंग आणि पॅकेजिंग यांचा समावेश आहे.

इस्रो आणि नासा यांच्यात अंतराळ करार

याशिवाय भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्टेमिस करारावरही शिक्कामोर्तब झाले आहे. याअंतर्गत दोन्ही देश अवकाश संशोधनावर एकत्र काम करतील. या कराराअंतर्गत NASA आणि ISRO ने 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. 2025 पर्यंत मानवांना चंद्रावर परत आणणे हे अमेरिकेच्या नेतृत्वाखालील मिशन आहे, ज्याचे अंतिम उद्दिष्ट मंगळावर आणि त्यापलीकडे अंतराळ संशोधनाचा विस्तार करणे हे आहे.

सेमीकंडक्टर भारतात तयार होणार
भारत आणि अमेरिका यांच्यात ICET करारही झाला आहे. याअंतर्गत दोन्ही देश टेक रिसर्च, सिव्हिलियन स्पेस, क्वांटम टेक्नॉलॉजी आणि सेमीकंडक्टर सप्लाय चेनच्या बाबतीत एकत्र काम करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन चिप निर्माता मायक्रोन टेक्नॉलॉजीला भारतात सेमीकंडक्टर उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यामुळं सेमींकडक्टरची निर्मिती आता भारतात होणार आहे.

बेंगळुरू आणि अहमदाबादमध्ये दूतावास

दुसर्‍या राजनैतिक करारामध्ये, अमेरिका दोन देशांतील नागरिकांमधील संबंध वाढवण्यासाठी बेंगळुरू आणि अहमदाबादमध्ये दोन नवीन वाणिज्य दूतावास उघडेल. याशिवाय भारतीयांमधील संबंध वाढवण्यासाठी सिएटलमध्ये एक मिशन स्थापन केले जाणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube