ब्लिंकिट, मीशो अन् मिंत्रावर महिलांचेच राज्य; स्क्रिन टाईममध्येही पोरं मागेच; आकडे बघून झोप उडेल!

Social Media Report इंटरनेटच्या दुनियेत आता पुरुषांचे वर्चस्व संपत चालले असून महिलांनी मोठी बाजी मारली आहे.

  • Written By: Published:
Youth Social Media Use

Women Spend More Time Than Men On Digital Platforms : तुम्ही दिवसभरात किती वेळ मोबाईल स्क्रीनवर घालवता? नुकत्याच समोर आलेल्या एका राष्ट्रीय अहवालातील आकडेवारी पाहिली, तर तुमचीही झोप उडेल! देशातील मोठ्या शहरांमधील 18 ते 24 वयोगटातील तरुण पिढी दररोज सरासरी 2 तासांपेक्षा म्हणजेच 120 मिनिटे अधिक वेळ ऑनलाईन विश्वात घालवत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या सोशल मीडियाच्या आणि ऑनलाईन शॉपिंगच्या शर्यतीत तरुणींनी तरुणांना खूप मागे टाकले असून, त्या मुलांपेक्षा तब्बल 47 टक्क्यांनी अधिक सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. ‘VTON’ आणि ‘इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया’ (IAMAI) च्या अहवालातून हा खळबळजनक खुलासा झाला आहे.

तरुणाई झाली ‘डिजिटल अ‍ॅडिक्ट’; रोज 120 मिनिटांचा पहारा

अहवालानुसार, एक सामान्य भारतीय नागरिक दररोज सरासरी 1 तास 38 मिनिटे सोशल मीडियावर घालवतो. मात्र, 18 ते 24 वयोगटातील कॉलेज कट्ट्यावरील तरुण-तरुणींचा स्क्रीन टाईम हा सर्व वयोगटांपेक्षा सर्वाधिक म्हणजे दररोज 2 तासांच्या वर गेला आहे. यामध्ये केवळ फेसबुक किंवा इंस्टाग्राम रील्स पाहणे नाही, तर चॅटिंग आणि माहिती शोधणे यात रोज सुमारे 58.6 मिनिटे खर्च होत आहेत.

शॉपिंग अ‍ॅप्सवर महिलांची मक्तेदारी 

इंटरनेटच्या दुनियेत आता पुरुषांचे वर्चस्व संपत चालले असून महिलांनी मोठी बाजी मारली आहे. ऑनलाईन शॉपिंग आणि घरगुती वस्तू मागवण्याच्या प्लॅटफॉर्मवर महिलांचा वावर अवाढव्य वाढल्याचेही समोर आले आहे. झटपट डिलिव्हरी देणाऱ्या ‘ब्लिंकिट’ वर 57 टक्के ग्राहक महिला आहेत. तर कपडे आणि फॅशनसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘मीशो’ वर 61 टक्के आणि ‘मिंत्रा’ वर 54 टक्के महिला युजर्स सक्रिय असल्याचेही रिपोर्टमध्ये नमुद करण्यात आले आहे. मोठ्या शहरांमधील 25 ते 34 वयोगटातील महिला दररोज सरासरी 35.2 मिनिटे शॉपिंग अ‍ॅप्सवर घालवतात, तर याच वयाचे पुरुष केवळ 24.8 मिनिटे ऑनलाईन असतात. म्हणजेच खरेदीच्या बाबतीत स्त्रिया पुरुषांपेक्षा 42 टक्क्यांनी पुढे आहेत.

देशात ‘AI’ अ‍ॅप्सचा वापर थेट 100 टक्क्यांनी वाढला

यंदाच्या वर्षातील सर्वात मोठी क्रांती म्हणजे AIअ‍ॅप्सचा वाढती क्रेझ होय. तरुणाईमध्ये अभ्यासापासून ते अगदी फोटोग्राफी आणि कंटेट क्रिएशनसाठी AI चा वापर वाढला आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा AI अ‍ॅप्सच्या वापरात 100 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्याचबरोबर, ऑनलाईन व्यवहार आणि कर्जाच्या (Loan & Credit Apps) अ‍ॅप्स वापरणाऱ्यांच्या संख्येतही 30 टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे.

वयोगटानुसार आवडीनिवडी बदलल्या

35 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक सोशल मीडियापेक्षा करमणूक (OTT, गाणी, चित्रपट) क्षेत्रात अधिक वेळ घालवतात. त्यांचा रोजचा सरासरी वेळ 77.2 मिनिटे आहे. तर,  18 ते 24 वर्षांचे तरुण प्रामुख्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि एकमेकांशी सतत कनेक्टेड राहण्यासाठी इंटरनेटचा वापर करत असल्याचे या रिपोर्टमधून समोर आले आहे.

follow us