महिला आरक्षण विधेयकावर आज मतदान; लोकसभा, विधानसभेतील महिलांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा?
Women's Reservation Bill मांडले आहे. त्यावर आज शुक्रवारी दुपारी 4 वाजता मतदान पार पडणार आहे. त्यामुळे आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे.
Women’s Reservation Bill Voting today Will it pave the way for 33 percent reservation for women in Lok Sabha and Assembly : महिला आरक्षण लागू करण्यासाठी गुरूवारी संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. हे अधिवेशन उद्या पर्यंत चालणार असून 2029 च्या लोकसभा निवडणुकांपासून महिला आरक्षण लागू करण्याच्या उद्देशाने सरकारने महत्वाचे विधेयक मांडले आहे. त्यावर आज शुक्रवारी दुपारी 4 वाजता मतदान पार पडणार आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभेतील महिलांच्या 33 टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यास आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे.
चैत्र अमावस्या कुणाला फायद्याची अन् कुणाला प्रतिकुल, जाणून घ्या आजचे राशीभविष्य…
महिला आरक्षण विधेयकाच्या बाबतीत सरकार ‘करा किंवा मरा’ अशा स्थितीत असल्याचं दिसत आहे. (Loksabha) काँग्रेससह विरोधी पक्ष या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी मैदानात आहेत. सरकारने गुरुवारी (दि. 16 एप्रिल)रोजी लोकसभेत नियम 66 निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याचा उद्देश महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयके एकाच वेळी मंजूर करून घेणं हा आहे.
महाराष्ट्रातील राजकारणी पायावर धोंडा पाडून घेतायत; डॉ. पळशीकरांना मतदारसंघ पूर्नरचनेता धोका सांगितला
सरकार आज तीन विधेयके सादर करणार आहे. घटनादुरुस्ती 131 मध्ये जागांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव असेल. दुसरे विधेयक, परिसीमन विधेयक 2026, परिसीमन आयोगाची स्थापना करेल. तिसरं विधेयक केंद्रशासित प्रदेश कायदे (सुधारणा) 2026 असेल. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल घटनादुरुस्ती 131 आणि परिसीमन विधेयक 2026 सादर करतील. केंद्रशासित प्रदेश कायदे (सुधारणा) 2026 सादर केले जातील.
बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार; शासकीय कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार
लोकसभेतील संख्याबळलोकसभेत एकूण ५४३ सदस्य आहेत. दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यासाठी सरकारला ३६० खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.एनडीएकडे सध्या आहेतभाजप: 240, टीडीपी: 16, जेडीयू: 12, शिवसेना: 7, इतर मित्रपक्ष: 18, असेएकूण: 293 खासदार. याचा अर्थ सरकारला 360 चा आकडा गाठण्यासाठी 67 खासदारांची कमतरता आहे.
दु:खद! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू
राज्यसभेतील गणित – राज्यसभेत एकूण 245 सदस्य आहेत. दोन-तृतीयांश बहुमतासाठी 163 खासदारांची आवश्यकता आहे. त्यामध्ये एनडीएकडे भाजप: 106, जेडीयू: 4, टीडीपी: 2, शिवसेना: 2, इतर मित्रपक्ष: 20, असे एकूण: 134 खासदार. याचा अर्थ सरकारला 29 खासदारांची कमतरता आहे.