Chenab Railway Bridge : जगातील सर्वांत उंच ‘चिनाब रेल्वे पूल’ पूर्णत्वास…

- जम्मू-उधमपूर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग असलेल्या या पूलामुळे जम्मू काश्मीरमधील दुर्गम भाग जोडला जाणार आहे.
- या पुलाचे अभियांत्रिकी काम पूर्णत्वास आले असून हा पूल पॅरिसमधील आयफेल टॉवर पेक्षाही 35 मीटर उंच आहे.
- जम्मू आणि काश्मीरमधील जगातील सर्वात उंच असलेला हा ‘चिनाब रेल्वे पूल’ भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरला आहे.
- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
- जगातील सर्वात उंच रेल्वे पूल ‘चिनाब पूला’चं काम अंतिम टप्प्यात आले आहे.